Cotton Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Disease : बोंडसडवर लवकरच शोधणार उपाय

Cotton Research Center : देशांतर्गत कापूस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत बोंडअळीच्या जोडीला बोंडसडचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ः देशांतर्गत कापूस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत बोंडअळीच्या जोडीला बोंडसडचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने बोंडसड नियंत्रणासाठी संशोधनावर भर दिला आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीने देखील त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून १ कोटी १० लाख रुपयांचा निधी दिला असून तीन वर्षांचा कालावधी या प्रकल्पाकरिता निश्‍चित करण्यात आला आहे.

कीटकनाशकापासून बचाव त्यासोबतच सुरक्षित जागा म्हणून बोंडाच्या आत अळी जागा शोधते. आता गेल्यानंतर या अळीद्वारे बोंड पोखरल्या जाते. त्यामुळे वरच्या बाजूने बोंड हिरवे दिसत असले तरी आतून ते पोखरले असते. त्यामुळे अशा बोंडात कापूसच भरत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. विशेष म्हणजे अळी बोंडाच्या आत असल्याने त्यावर कोणत्याच कीटकनाशकाचा प्रभावी परिणामही होत नाही.

गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने बोंडसडच्या प्रभावी नियंत्रणासाठी उपाययोजनांवर भर दिला आहे. बोंडसडचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत बुरशी व इतर घटकही अभ्यासले जात असल्याची माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. दीपक नगराळे यांनी दिली.

नगराळे यांच्या माहितीनुसार, अमेरिका, चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये देखील कापसात बोंडसडचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्या भागातही संशोधनात्मक कार्य सुरू आहे. परंतु तेथेही अद्याप अपेक्षित परिणाम साधता आले नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने अनेक अनेक पातळ्यांवर संशोधनावर भर दिला आहे.

त्यामध्ये संस्थेकडे असलेल्या जर्मप्लाझमधून बोंडसडला प्रतिकारक नवे वाण निवड पद्धतीने मिळू शकते का? यावरही काम सुरू आहे. त्याकरिता संस्थेच्या प्रक्षेत्रावर अशा वाणांच्या ट्रायल घेतल्या जात आहेत. सामूहिक पातळीवरील संशोधनातून निश्चितच सकारात्मक परिणाम साधेल, असाही विश्‍वास डॉ. नगराळे यांनी व्यक्‍त केला.

बोंडसडचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्याकरिता विविध प्रकारच्या ट्रायल घेण्यात येत आहे. राशी बियाणे उत्पादक कंपनीने या कामासाठी महाराष्ट्राकरीता ८४.८५ लाख आणि नॉर्थ इंडियातील संशोधनात्मक कामासाठी ७९.१४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तीन वर्षाचा हा प्रकल्प आहे. त्यासोबतच संस्थांत्मक पातळीवर देखील आमचे संशोधन कार्य सुुरु आहे.
- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT