Cold Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

Agriculture Infrastructure : जत दुय्यम बाजार आवारामध्ये डाळिंब व बेदाण्यासाठी नवीन शितगृह उभारण्यात येईल. तर इतर बाजार समितीच्या उपवारामध्ये पायाभूत सुविधा भक्कम करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती सुजय शिंदे यांनी केली.

Team Agrowon

Sangli News : जत दुय्यम बाजार आवारामध्ये डाळिंब व बेदाण्यासाठी नवीन शितगृह उभारण्यात येईल. तर इतर बाजार समितीच्या उपवारामध्ये पायाभूत सुविधा भक्कम करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती सुजय शिंदे यांनी केली. तसेच अंतर्गत रस्त्यांसह शेतकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार येण्यात असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

येथील वारणा मंगल कार्यालयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा गुरुवारी (ता. २६) सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपसभापती रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक, सचिव महेश चव्हाण व शेतकरी उपस्थित होते.

सभापती शिंदे म्हणाले, की शेतकरी कच्ची हळद विक्री करत आहेत तर गूळ गुऱ्हाळांवर विक्री करत आहेत. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ते त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाजार समितीकडे शेतीमालाची आवक वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्य बाजार समिती आवारसह उपबाजार समिती व दुय्यम बाजार आवार आदी ठिकाणी रस्ते डांबरीकरणासह इतर सुविधांची कामे लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सावळी येथे बेदाणा विक्री हॉल उभारणार असून जत येथे शेतकऱ्यांसाठी शितगृह अशी सुमारे सात कोटी रुपयांची कामे उभारणार आहे. जतला डाळिंब हॉल यासह मुलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. उपसभापती रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.

द्राक्ष व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या फसवणुकीला आळा घाला

येत्या काही महिन्यांत द्राक्ष हंगामाला सुरुवात होत आहे. गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष हंगामात व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.

बाजार समिती आणि पोलिसांकडून द्राक्ष व्यापाऱ्यांनी परवानगी घेतली पाहिजे. बाहेरून अनेक व्यापारी येतात, त्यांची बाजार समितीने अनामत रक्कम घ्यावी. द्राक्ष व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या फसवणुकीला आळा घालण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Scheme: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामात भ्रष्टाचार? चौकशी होणार

Fish Farming: मत्स्यपालनामध्ये व्यावसायिक संधी...

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

Soybean Milk Benefits: सोयाबीन दूध नवजात करडांसाठी फायदेशीर

Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT