Wild Animal Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : खानदेशात पिकांत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

Wild Animal Issue : खानदेशात पिकांत डुकरे, रोही, नीलगायी, हरणे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ करीत आहेत. केळीसह मका, भाजीपाला पिकांची मोठी हानी होत असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पिकांत डुकरे, रोही, नीलगायी, हरणे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ करीत आहेत. केळीसह मका, भाजीपाला पिकांची मोठी हानी होत असून, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. केळी पीक वाढीच्या व निसवणीच्या स्थितीत आहे. अनेकांचे पीक निसवले असून, काढणीवर आहे.

या बागांत रानडुकरे रोज पहाटे किंवा मध्यरात्री धुडगूस घालतात. झाडांचे नुकसान करतात. यात झाड कोसळून त्यावरील घडाचेही १०० टक्के नुकसान होते. कारण एकदा झाड कोसळल्यानंतर त्यातून कुठलेही उत्पादन येत नाही. मका, तूर आदीची पेरणीही झाली आहे. या पिकांतही रानडुकरे व अन्य वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहेत. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सर्वत्र ही समस्या आहे.

सातपुडालगत रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा या भागासह सातमाळालगत पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि अन्य वन क्षेत्रांच्या भागात पिकांची हानी वन्यप्राणी करीत आहेत. अलीकडेच पेरणी केली व ती उद्ध्वस्त झाली, यामुळे शेतकरी वित्तीय संकटात आहेत. जेव्हा पाऊस नसतो, तेव्हाही नुकसान होते व पेरणी व पाऊसमान चांगले राहील्यास वन्यप्राणी नुकसान करतात. शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागतो, अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

वन विभाग या सर्व प्रकाराची माहिती आहे. परंतु नुकसानीनंतर किती शेतकऱ्यांना भरपाई मिळते, हादेखील प्रश्न आहे. ऊस, केळी पिकांत वन्यप्राणी लपून असतात. अनेकदा शेतकऱ्यांवर हल्लेही करतात. दर महिन्याला दोन -तीन शेतकरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होतात. परंतु या समस्येबाबत कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उमरदे येथे हानी

उमरदे (ता.एरंडोल) येथे नुकतेच रानडुकरांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील मका पिकाचे नुकसान केले. एका रात्रीतून पूर्ण शेतातील पीक उद्ध्वस्त झाले. संजय महाजन यांनी उमरदे शिवारात सात एकरात मका लागवड केली होती. लागलीच पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याचे दिसून आले. पहाटेच्या वेळी किंवा मध्यरात्री हा प्रकार झाला, असावा असा कयास आहे. याची माहिती लागलीच महाजन यांनी वन विभागाला दिली. उमरदे, पद्मालय नजीक मागील महिन्यात २० ते २२ शेतांत असेच नुकसान वन्यप्राण्यांनी केल्याची माहिती आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला असून, नुकसानीसंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविल्याची माहिती वन विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT