Dr. Murli Ingle Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Vegetables : रानभाज्या हा निसर्गातील अनमोल मोठा ठेवा : डॉ. इंगळे

Dr. Murli Ingle : निसर्गात आढळणाऱ्या रानभाज्या हा आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले.

Team Agrowon

Akola News : निसर्गात आढळणाऱ्या रानभाज्या हा आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी केले. बाळापूर येथे आत्माच्या पुढाकाराने सोमवारी (ता.१२) रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

नऊ ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा होत असतो. या दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव प्रत्येक तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने बाळापूर येथे रानभाजी महोत्सव घेण्यात आला. बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात हा महोत्सव झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. इंगळे यांनी केले. कार्यक्रमाला आत्मा तालुका सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र पोहरे, बाजार समितीचे संचालक रमेश ठाकरे, उमेशअप्पा भुसारी, जिल्हा परिषद सदस्य मिनाताई बावणे, आत्मा समिती सदस्य ऋषिकेश वाकडे, अनंता राऊत, प्रकाश धनोकार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय काळे,

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजीराव जाधव उपस्थित होते. रमेश ठाकरे, रवींद्र पोहरे यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते सहभागी गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात २८ हून अधिक रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. यात करटोली, चिवय, आघाडा, पाथरी, अंबाडी, केणा, करवंद, चमकुराची पाने, फांदीची भाजी,

तरोटा, आंबट चुका, वाघाटे, गवत्ती चहा, गोबरू कंद, तांदुळजा, सुरणकंद, कुर्डु, गुळवेल, शेवगा, कुंजीर, शेरणी, मुंगटी, कपाळफोडी, खापरफुटी, पाथरी, दंडोळे आदींसह इतर रानभाज्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेगोकार यांनी केले तर आभार मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT