Elephant Rampage Agrowon
ॲग्रो विशेष

Elephant Rampage : जंगली हत्तींचा शेतशिवारात धुमाकूळ

Wild Elephant : आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथे जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. यामध्ये शेतातील धान पुंजन्याचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Gadchiroli News : गडचिरोली ः आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथे जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. यामध्ये शेतातील धान पुंजन्याचे मोठे नुकसान झाले. सौर कृषिपंपाची तोडफोड देखील हत्तींनी केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

जंगली हत्तींचा कळप गेल्या दिवसांपासून वडसा वन विभागाचया जंगलात फिरत आहे. सध्या जंगली हत्तींचा मुक्‍काम पोर्ला वन परिक्षेत्रात असून चुरमुरा भागातील शेतीचे मोठे नुकसान हा कळप करीत आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धान पुंजन्याची नासधूस हत्तींकडून होत आहे.

परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने यावर नियंत्रणाची मागणी शेतकरी करीत आहे. हत्तींचा हा कळप शेतातील काढणी केलेल्या पिकाबरोबरच कृषी साहित्याची देखील तोडफोड करीत आहे. चुरमुरा भागातील शेतकरी विजय शेंडे यांच्या शेतातील जमा करून ठेवलेल्या धानाच्या पुंजन्याची नासधूस करण्यात आली.

त्याच जंगली हत्तींच्या कळपाने नंतर आपला मोर्चा शेतातील सौर कृषिपंपांकडे वळविला. सौर पंपांची व शेतातील झोपडीची मोडतोड केली. परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत जंगली हत्तींचा वावर वाढला आहे.

हत्तींचा मोर्चा आता देलोडा गावाकडे

चुरमुरा भागात शेती व साहित्याचे नुकसान केल्यानंतर जंगली हत्तींनी आपला मोर्चा दुसरीकडे वळविला आहे. हा कळप सध्या देलोडा परिसरात गेल्याची माहिती आहे. वन विभाग या जंगली हत्तींच्या कळपावर लक्ष्य ठेवून असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT