Wild Boars  Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Boar Rampage : मसाई पठारच्या पायथ्याला रानडुकरांकडून पिकांचा फडशा

Wild Animal Crop Damage : मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या बादेवाडी, वेखंडवाडी गावच्या शिवारातील शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या व हातातोंडाशी आलेल्या शाळू, मका या पिकांचा रानडुकरांनी फडशा पाडला.

Team Agrowon

Kolhapur News : मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या बादेवाडी, वेखंडवाडी गावच्या शिवारातील शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेल्या व हातातोंडाशी आलेल्या शाळू, मका या पिकांचा रानडुकरांनी फडशा पाडला.

रानडुकरांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. बादेवाडी येथील बाजीराव गवड, सुनील गवड, वसंत शिंदे, तुकाराम कंदुरकर, विष्णू गवड, तर वेखंडवाडी येथील सर्जेराव खोत, आनंदा पंदारे, खंडेराव खोत, पांडुरंग खोत, नानासाहेब खोत, अतुल खोत यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मसाई पठाराचा परिसर डोंगराळ असल्याने येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण, येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पावसाच्या पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे परिसरातील बादेवाडी, वेखंडवाडी, तुरुकवाडी तसेच वाडी वस्तीवरील शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिका मारून आपला पारंपरिक शेती व्यवसाय जिवंत ठेवला आहे.

पावसाळी भात व अन्य पिके घेतल्यानंतर उन्हाळ्यात रिकाम्या शेतीत उन्हाळी शाळू, मका आदी पिके घेऊन उदरनिर्वाह चालवतात. जवळपास अडीच तीन महिने राबून पिकवलेली ती पिके सध्या पोटरीला आली आहेत. नेमक्या याचवेळी रानडुकरांच्या कळपाने शिवारात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, शाळू, मका पिके फस्त केली आहेत.

‘बांधारी परिसरात रानडुकरे, साळिंदर आणि वानरांचा मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वावर आहे. त्यांच्याकडून पिके फस्त केली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांना रानडुकरांच्या काळपाचा फोटो पाठवूनही त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. वनविभागाने तत्काळ उपायायोजना न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.
- अनिल कंदुरकर, माजी सभापती, पं. स.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT