Wild Animals Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animals Issue : भोरच्या पश्‍चिम भागात वन्यप्राण्यांचा धुडगूस

Crop Damage Issue : भोरच्या पश्‍चिम भागात वन्यप्राणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

Team Agrowon

Bhor News : भोरच्या पश्‍चिम भागात वन्यप्राणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कितीही युक्त्या केल्या तरी वन्यप्राणी पिकांत धुडगूस घालीत आहेत. भातासह इतर पिकांची नासधूस होत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

भोरचा पश्चिम भाग डोंगराळ भागात यंदा चांगल्या असलेल्या पिकांत वन्य प्राण्यांनी शिरकाव केल्याने मोठे नुकसान होत आहे. यात रानडुकरे, वानरे, माकडे, सांबर, भेखर, ससे व मोर प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान होत आहे. जुन्या साड्या व रंगीत कापडांचे कुंपण करणे, रात्रीची राखण करणे, भुजगावणे उभारणे, पत्राचे डबे -फटाके वाजवणे, बिसलेरी बाटलीत वाळू भरून तारेला बांधणे आदी वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवून शेतकरी आपल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

मात्र, त्यातून ही रानटी प्राणी मोका शोधून शेतात शिरतात व शेताचे नुकसान करतात. त्यामुळे वनविभागाकडून काहीतरी भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी वनविभागाकडे अर्ज करीत आहेत.

वन्य प्राण्यांच्या प्रत्येक वर्षीच्या त्रासातून मुक्तता व्हावी यासाठी कायम स्वरूपाच्या कुंपणासाठी शासनाने अर्थसाह्य करावे, वन्यप्राणी हुसकवण्यासाठी उपकरणे उपलब्ध करावीत तसेच वनविभागाकडून मिळणारी नुकसानभरपाई नुकसानीच्या अल्प प्रमाणात मिळत असल्याने ती वाढवून मिळावी.
धोंडिबा मालुसरे, शेतकरी हिर्डोशी
वन्य प्राण्यांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अर्ज करावेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई दिली जाईल.
शीतल राठोड, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, भोर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT