Annual Meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Union Meeting : 50 लिटरची अट वगळणारा सूर्याची पिसाळ कोण?; गोकुळ वार्षिक सभास्थळी पोस्टर वॉर

Annual Meeting : गेल्या चार वर्षात दरवर्षी होणारी कोट्यावधींची घट कशामुळे झाली, असे अनेक डिजिटल फलक लावून सत्ताधाऱ्यांना सवाल करण्यात आला.

sandeep Shirguppe

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज 30 ऑगस्टला संपन्न झाली. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात दुपारी एक वाजता सभेला सुरूवात झाली. सभा वादळी होणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काटेकोर नियोजन केले होते.

तसेच गोकुळचे कारभारी मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होते. विरोधकांनी गोकुळ दूध संघात गैरकारभार सुरू असल्याची टीका डिजिटल फलकांच्या माध्यमातून सभास्थळी लावले होते.

गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी डिजिटल फलकांद्वारे गोकुळ सत्ताधाऱ्यांना सवाल उपस्थित केला. यामध्ये दूध उत्पादकांच्या संघाच्या पैशातून पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारायचे आणि शिक्षण सम्राटांच्या घशात घालायचे ठरलंय का? सभासत्वासाठी असलेली 50 लिटरची अट वगळणारा सूर्याची पिसाळ कोण?

संघाच्या पशुवैद्यकीय सेवेचा बोजवारा उडालेला असताना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा घाट कशासाठी? दहा लिटर दूध घालणारा सुद्धा अ वर्ग सभासद आणि 1000 लिटर दूध घालणारा सुद्धा अ वर्ग सभासद! हा कुठला न्याय? दूध उत्पादकांच्या पैशातून उभारण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात सभासद दूध उत्पादकांच्या पोरांना शिक्षण मिळणार का? गेल्या चार वर्षात दरवर्षी होणारी कोट्यावधींची घट कशामुळे झाली, असे अनेक डिजिटल फलक लावून सत्ताधाऱ्यांना सवाल करण्यात आला.

तसेच सभास्थळी सभेचे कामकाज वाचून सांगत असताना अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याविरोधात महाडिक समर्थकांनी नामंजूर अशी जोरदार घोषणाबाजी केली तर सतीश पाटील समर्थकांनीही हातात झेंडे उंचावत मंजूर मंजूर असा नारा दिला. यावेळी सतेज पाटील समर्थक आणि शोमिका महाडिक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद टळला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT