Majha Ladka Bhau Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladka Bhau Yojana : लाडक्या भावाला कधीपर्यंत १० हजार मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी खरंच माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली का?

CM Eknath Shinde : या योजनेतून बाराबी उत्तीर्ण लाडक्या भावाला महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा उत्तीर्ण भावाला ८ हजार रुपये आणि पदवीधारकाला महिन्याला १० हजार रुपये मिळणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Team Agrowon

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लाडका भाऊ योजना जाहीर केली आणि दिवसभर या योजनेची चर्चा सुरु होती. या योजनेतून बाराबी उत्तीर्ण लाडक्या भावाला महिन्याला ६ हजार रुपये, डिप्लोमा उत्तीर्ण भावाला ८ हजार रुपये आणि पदवीधारकाला महिन्याला १० हजार रुपये मिळणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

पण या घोषणेनंतर संभ्रमही निर्माण झाला. कारण मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ ही नविन योजना जाहीर केली की अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचीच माहिती दिली. तसेच सर्वच बारावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारक आणि पदवीधारकांना पैसे मिळणार का? हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी कोणतीही नविन योजना जाहीर केली नाही. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचीच माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात केवळ माझा लाडका भाऊ योजनेचा उल्लेख केला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उल्लेख केला नाही. त्यामुळे या योजनेवरून गोंधळ निर्माण झाला. खरे तर शासनाने ९ जुलै रोजीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योनजेचा जीआर म्हणजेच शासन आदेश काढला आहे. त्यात स्पष्ट उल्लेख आहे की, बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना महन्याला ६ हजार, डिप्लोमा धारकांना ८ हजार आणि पदवीधारकांना १० हजार रुपये मिळतील.  

म्हणजेच १२ वी उत्तीर्ण, पदविकाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना अनुक्रमे ६ हजार, ८ हजार आणि १० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभाग घ्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला कोणत्यातरी कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करावे लागेल. तरच तुम्हाला हे विद्यावेतन मिळणार आहे. 

मुख्यमंत्र्यांनी बोलताना हे विद्यावेतन किती महीने मिळेल हे सांगितले नाही. पण शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की, केवळ सहा महिने हे विद्यावेतन मिळणार आहे. हे विद्यावेतन सरकार देणार आहे. 

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल. पण ज्या कंपनीत किंवा कार्यालयात तुम्ही प्रशिक्षण घेतलं म्हणजे तिथेच तुम्हाला कायमस्वरुती नोकरी मिळेल असे नाही. तर त्या कंपनीला योग्य वाटले तरच ती कंपनी तुम्हाला कायम करणार आहे. म्हणजेच नोकरीची हमी नाही. तसेच प्रशिक्षम काळात तुम्हाला शासनाच्या कोणत्याही नियमाचा फायदा होणार नाही. 
म्हणजेच काय तर शासनाने युवकांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला असेच म्हणावे लागेल. तसेच मुख्यमंत्र्यांनी कोणतीही नविन योजना जाहीर केली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT