Cotton Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Podcast : बाजार समित्यांमधील कापसाचे भाव कधी वाढतील?

Market Update : देशातील वायदे वाढून ५८ हजार ६८० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम आहे.

Team Agrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चांगलीच वाढ झाली. कापसाचे वायदे शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ९१.५८ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील वायदे वाढून ५८ हजार ६८० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम आहे.

बाजारात आजही कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक कायम होती. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजार समित्यांमधील भावही सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी दिला. 

देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काल क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत वाढ झाली होती. ही वाढ आजही कायम होती. सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

तर बाजारातील आवक २ लाख ८० हजार पोत्यांची झाली होती. एक पोते ५० किलोचे असते. बाजारातील आवक पुढील काही दिवसांपासून कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

बाजारातील घटती आणि चांगला उठाव, यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

लसणाच्या भावातील तेजी कायम आहे. लसणाचे भाव नव्या विक्रमी पातळीवर पोचले आहेत. यंदा लसणाचे उत्पादन कमी राहीले. देशातील महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये कमी पाऊस, पावसाचा ताण, प्रतिकूल हवामान यामुळे पिकावर परिणाम होऊन उत्पादन कमी झाले. तर ऐन आवकेच्या हंगामात खूपच कमी भाव होता.

या सर्व कारणांनी सध्या लसणाची बाजारातील आवक खूपच कमी आहे. यामुळे लसणाचे भाव १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. लसणातील ही तेजी आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याच्या भावाला चांगला आधार आहे. मर्यादीत पुरवठा आणि चांगला उठाव असल्याने मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

सरकारही मक्याची हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळे वाढलेली मागणी आणि हमीभावाने खरेदी याचा एक आधार मक्याला तयार झाला. त्यामुळे यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

SCROLL FOR NEXT