Takari Upsa Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’खालील उर्वरित आठ हजार हेक्टरला पाणी मिळणार कधी?

Agriculture Irrigation : ताकारी उपसा सिंचन योजनेचे लाभ क्षेत्र २७ हजार ४३० हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

Team Agrowon

Sangli News : ताकारी उपसा सिंचन योजनेचे लाभ क्षेत्र २७ हजार ४३० हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्षात सिंचनाखाली आले नाही. या क्षेत्राला

सिंचनाची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, अद्याप उर्वरित क्षेत्राला पाणी मिळाले नाही. त्यामुळे ताकारीचे पाणी कधी मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. ताकारी योजना ही कडेगाव, खानापूर, तासगाव या दुष्काळी भागासाठी महत्त्वाची ठरली आहे.

या तालुक्याबरोबर मिरज आणि वाळवा तालुक्यातील शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध होत आहे. ‘ताकारी’च्या चारही टप्प्यांची तसेच मुख्य कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. कृष्णा-कोयना सिंचन लवादाने ताकारी योजनेच्या पावसाळ्यासाठी १.८५, रब्बीसाठी ४.३७ तर उन्हाळी आवर्तनासाठी ३.१२ टीएमसी असा एकूण ९.३४ टीएमसी पाणीसाठा २७ हजार ४४३ हेक्टरसाठी राखीव केला आहे.

त्यानुसार आवर्तनाचे नियोजन करून प्रत्येक आवर्तनाचे पाणी उचलून दिले जाते. वास्तविक पाहता, १८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. पाटबंधारे विभाग प्रत्यक्ष सिंचनाखाली आलेल्या क्षेत्रानुसार पाणीपट्टी वसूल करतात.

‘ताकारी’च्या लाभ क्षेत्रातील सिंचनाखाली येणारे क्षेत्र टप्प्या टप्प्याने वाढवले आहे. त्यानुसार आवर्तनाचे नियोजन केले जात आहे. मात्र, अद्याप ८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलेले नाही. मात्र, या क्षेत्रासाठी सिंचनाची सुविधा पाटबंधारे विभागाने उपलब्ध करून दिली आहे, असे सांगण्यात येत आहे.

तसेच पाटबंधारे विभागाने या उर्वरित क्षेत्रासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, बंदिस्त पाइपलाइन करण्यासाठी अडथळे येत आहेत. त्यामुळे ८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली कधी येणार? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

ताकारी सिंचन योजनेचे लाभक्षेत्र

तालुका लाभक्षेत्र (हेक्टर)

कडेगाव ११ हजार ८२१

खानापूर ४ हजार १०२

पलूस १ हजार ५७६

तासगाव ९ हजार ०५६

मिरज ३८१

वाळवा ४९४

एकूण २७,४३०

ताकारी योजनेचे ८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्षात सिंचनाखाली आले नाही. हे क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या वर्षभरात या योजनेचे बंदिस्त पाइपलाइनने शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे ताकारी सिंचन योजनेचे संपूर्ण लाभक्षेत्र ओलिताखाली येईल.
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी उपसा सिंजन योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT