Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : थंडीमुळे विभागात गहू पेरणीस सुरुवात

Cold Weather : गेल्या आठवड्यापासून थंडीला काहीशी सुरुवात झाली आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाले आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या आठवड्यापासून थंडीला काहीशी सुरुवात झाली आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाले आहे. पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी ४ हजार ३७५ म्हणजेच ३ टक्के पेरणी झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी वाढल्यास गहू पेरणीस आणखी वेग येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा आहे. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेसा वाफसा झालेला नाही.

सध्या काही ठिकाणी गहू उगवणीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखले जातात. नगर जिल्ह्यातही बऱ्यापैकी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत कर्जत तालुक्यात गव्हाची चांगली म्हणजे सुमारे एक हजार ४४३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.

त्याखालोखाल जामखेड, संगमनेर, अकोले, कोपरगाव, नगर, पारनेर, पाथर्डी या तालुक्यांत गव्हाची पेरणी झाली आहे. श्रीगोंदा, शेवगाव, राहुरी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर तालुक्यांत अजूनही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बऱ्यापैकी म्हणजे १८४ हेक्टरवर पेरणी झाली.

त्यापाठोपाठ खेड, जुन्नर, बारामती, शिरूर, हवेली तालुक्यांत पेरणी झाली. तर मुळशी, मावळ, वेल्हे तालुक्यात अजूनही पेरणी सुरू झालेली नाही. सोलापुरातही दक्षिण सोलापुरात सर्वाधिक म्हणजे ७७८ हेक्टरवर तर त्यानंतर बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांत पेरणी झाली आहे.

पुणे विभागातील गहू पेरणी, क्षेत्र हेक्टरमध्ये

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारी

नगर ८६,४०५ २८८३ ३

पुणे ३९,८०३ ४८८ १

सोलापूर ४२५८८ १००४ २

एकूण १,६८,७९६ ४३७५ ३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT