Team Agrowon
गव्हाची लागवड करताना पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून द्याव.
पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. जमिनीत योग्य वाफसा असतानाच गव्हाची पेरणी करावी.
पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे. बी पाभरीने पेरताना दोन ओळीतील अंतर २० सेंमी ठेवाव. उभी आडवी पेरणी न करता बियाणे ५ ते ६ सेंमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.
पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला तीन ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर १० ते १५ किलो बियाण्याला २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करताना १०० ग्रॅम गूळ एक लिटर पाण्यात मिसळून तयार कलेल्या द्रावणाचा आवश्यक त्या प्रमाणात वापर करावा.
पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० किलो नत्र म्हणजेच ८७ किलो युरिया आणि २० किलो स्फुरद म्हणजेच १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्याव.
Chana Sowing : बीबीएफ पद्धतीने हरभरा पेरणीचे आहेत फायदेच फायदे