Wheat Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : खानदेशात तीन टप्प्यांत गहू पेरणीकडे कल

Rabi Season : खानदेशात मकर संक्रांतीपर्यंत गहू पेरणी केली जाते. ज्वारीच्या तुलनेत अधिकचा नफा देणारे पीक म्हणून गव्हाला अनेकांनी पसंती दिली आहे.

Team Agrowon

Jalgoan News : खानदेशात मकर संक्रांतीपर्यंत गहू पेरणी केली जाते. ज्वारीच्या तुलनेत अधिकचा नफा देणारे पीक म्हणून गव्हाला अनेकांनी पसंती दिली आहे. विविध टप्प्यांत पेरणी झाल्याने काही भागांत पीक निसवले आहे. तर काही भागांत पीक वितभर उंचीचे आहे.

गहू पेरणी खानदेशात यंदा अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे. अनेकांनी कापूस पीक काढून त्यात गहू पेरणी केली. तसेच सोयाबीन, उडीद-मूग आदी पिकांखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रातही गव्हाची पेरणी झाली. पेरणी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी अशा तीन महिन्यांत विविध टप्प्यांत झाली आहे.

गहू पेरणीसाठी १५ डिसेंबरपर्यंतचा कालावधी अनुकूल मानला जातो. पण खानदेशात अनेक शेतकरी मकर संक्रांतीपर्यंत गहू पेरणी करतात. यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही गहू पेरणी झाली आहे. विविध टप्प्यांत पेरणी झाल्याने पिकाची अवस्थाही वेगवेगळी आहे. काही भागात पीक निसवले असून, त्यात दाणे भरू लागले आहेत.

तर काही भागात पीक निसवणीच्या अवस्थेत आहे. या महिन्यात पेरणी केलेले गहू पीक तरारले असून, पिकाने वाढ धरली आहे. गहू पेरणी जळगाव जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर झाली आहे. गहू पिकाला काळी कसदार जमीन लाभदायी ठरत असल्याने काळ्या कसदार जमिनीत गहू पीक अधिक आहे. अनेकांनी कांदेबाग केळीची काढणी पूर्ण झालेल्या बागांत ठिबकवर गहू पेरणी केली आहे.

गहू पीक जळगावातील रावेर, यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव भागात अधिक आहे. धुळ्यातील शिरपूर, साक्री, धुळे, शिंदखेडा भागातही गहू पीक आहे. गव्हाचे दर ज्वारीपेक्षा अधिक आहेत.

शिवाय मोठ्या मळणीयंत्राने काही तासात मोठ्या क्षेत्रात गहू मळणी शक्य होते. मजुरांची गरज नसते. यामुळे अनेकांनी गहू पेरणीस पसंती दिली आहे. यंदा जलसाठेही सर्वत्र मुबलक आहेत. यामुळेदेखील गहू पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. गहू पिकाची वाढ थंडीमुळे जोमात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT