Wheat Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Harvesting : नगर जिल्ह्यात गव्हाची काढणी अंतिम टप्प्यात

Wheat Production : पंधरा दिवसांत काढणी उरकण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या गहू काढणीला जोमात सुरू असून, ही काढणी अंतिम टप्प्यात आहेत. पंधरा दिवसांत काढणी उरकण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.

अवकाळी पाऊस आला तर त्याचा फटका बसण्याच्या धास्तीने शेतकऱ्यांची गव्हाची काढणी करण्यासाठी धडपड सुरू आहे. जिल्ह्यात यंदा मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने काही भागात पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले. यंदा ९० हजार हेक्टरपर्यंत गव्हाची जिल्ह्यात पेरणी झाली आहे.

आता जिल्हाभरात गव्हाची काढणी सुरू झाली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. पाथर्डी, शेवगावातील काही भागांत हलकासा पाऊसही बुधवारी (ता. २७) झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतीकामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

कमी पावसामुळे विहिरींना कमी पाणी आहे. अशा भागात शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपेक्षा गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे.

शेवगाव तालुक्यातील जायकवाडी फुगवटा परिसरातील शहरटाकळी, दहिगावने, भावीनिमगाव, रांजणी, मठाचीवाडी, देवटाकळी, मजलेशहर भातकुडगाव परिसरात हार्वेस्टर यंत्र दाखल झाले असून गहू काढणी जोरात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT