Soybean Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पेरणीसाठी घरचे बियाणे वापरताना काय काळजी घ्यावी?

Farming Tips : खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता आणि बोगस बियाणे संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेचसे शेतकरी घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याला प्राधान्य देतात.

Team Agrowon

Agriculture Tips : खरीप हंगामात (Kharif Season) पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना बियाण्याची उपलब्धता आणि बोगस बियाणे संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेचसे शेतकरी घरचेच बियाणे पेरणीसाठी वापरण्याला प्राधान्य देतात.

मात्र बियाणे व्यवस्थित न साठवल्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता कमी झालेली असते. अलीकडे काढणी व मळणीच्या अवस्थेत पीक पावसात सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. बियाणे पावसात भिजल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता अत्यंत कमी होते.

अशा परिस्थितीत घरगुती बियाणे जतन करणे आणि तेच बियाणे पेरणीसाठी वापरताना खबरदारी बाळगणे आवश्यक असते. यामध्ये पुढील उपाययोजनांचा समावेश होतो.

साठवणूक करताना दाण्यात ओलाव्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

बियाणे साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. जेणेकरुन खालची ओल बियाण्याला लागणार नाही व बियाणे खराब होणार नाही.

बियाण्याची साठवणूक करताना जास्तीत जास्त ५ पोत्याची थप्पी मारावी त्यापेक्षा जास्त उंच थप्पी लावल्यास तळाच्या पोत्यातील बियाण्याची डाळ होऊन उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.

बियाणे पोत्यात साठवताना चारही बाजूने हवा खेळती राहील अशा रीतीने ठेवावे अन्यथा गोदामाच्या आत गरम जागा तयार होईल. त्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती खूप लवकर कमी होते.

बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा पण त्यासाठी कुलरचा वापर करु नये अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल त्यामुळे बियाणे खराब होऊ शकते.

आवश्यकतेनूसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास किडनाशकाची फवारणी करावी. जेणेकरुन बियाण्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल.

पेरणीपुर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT