Water Management
Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : पाणी टिकून ठेवण्यात जंगलांच महत्त्व काय?

Nagesh Tekale

Water Management जलव्यवस्थापन हा शासनाचा विषय असू शकत नाही शासनाने तो स्वत: ‘जनसेवा’ या गोंडस रुपाखाली स्वत:च्या खांदयावर घेतला आहे आणि हे ओझे आता एवढे वाढले आहे की ते त्याच्या पेलण्या पलीकडे गेले आहे.

मनुष्य व्यक्ती, कुटूंब हे समाजाचे घटक आहेत आणि जलव्यवस्थापन (Water Resource) हे त्यांचे क्षेत्र आहे. पूर्वी घरोघरी आड होते, हवे तेवढेच पाणी आडातून काढले जात होते कारण पोहरा ओढून पाणी काढण्यासाठी कष्ट होते म्हणून पाण्याचा योग्य आणि कमीतकमी वापर (Water Use) होता.

ज्यांच्या घरी आड नव्हता तेही पाणी घेण्यास येत असत. त्यांना कुणी अडवत नव्हते कारण त्यावेळी जल व्यवस्थापन या क्षेत्राला सेवेची झालर होती. जनसेवेची जपमाळ घेतलेल्या शासनाने जेथे प्रजेचा असा स्वत:चा असा शाश्वत जलपुरवठा होता तेथे नळयोजना आणली आणि घरामधील आडावर कायमचे झाकण टाकले गेले.

फुकटच्या नळाचे पाणी धोधो वाहू लागले आणि कालांतराने आडांच्या कचराकुंडया झाल्या. जलव्यवस्थापनात शासनाचा संबध हा जल उपलब्धीपर्यंतच असावा. एकदा जल उपलब्ध झाले की त्याच्या व्यवस्थापनात शासनाबरोबर जनतेने सुध्दा सामिल होणे गरजेचे आहे.

चार दशकापूर्वी मी नागपुरच्या राष्ट्रिय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेत शास्त्रज्ञ पदावर कार्यरत असताना माझ्या टेबलवर एका प्रकाशकाने जल व्यवस्थापनावरचे एक मोठे पुस्तक अभिप्रायासाठी ठेवले होते.

प्रगत राष्ट्रामधील जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट ज्ञान भांडार त्यात होते. अमेरिका, जपान, कॅनडा, इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन राष्ट्रे एवढी प्रगत का झाली? औदयोगिक प्र्रगतीमुळे? मुळीच नाही.

या राष्ट्रांना प्रगती पथावर घेऊन जाण्यास औदयोगिक क्षेत्राबरोबर निसर्ग संवर्धन आणि जल व्यवस्थापन तेवढेच जबाबदार आहे. या अनेक राष्ट्रामधील शेतीचा अभ्यास करताना मला त्यांचे जल व्यवस्थापन पाहून आश्चर्याचा धक्काच बसला.

या राष्ट्रामध्ये पावसाळा हा ऋतूच नाही म्हणजे आपल्याकडे जसे ३-४ महिने पाऊस असतो तसा तिकडे नसतो असे असुनही पाण्याची कुठेही कमतरता नाही, यास मुख्य कारण म्हणजे या प्रत्येक राष्ट्राला प्राप्त झालेली जंगल श्रीमंती. उत्कृष्ट जलव्यवस्थापनासाठी या आठ राष्ट्राबरोबरच विकसनशील चीन आणि इस्त्राइलचा येथे अवश्य उल्लेख हवा.

जल व्यवस्थापनासाठी प्रचंड मोठया विज्ञान विषयक ग्रंथाचा अभ्यास करण्यापेक्षा या राष्ट्रांनी या क्षेत्रात नेमके काय केले याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. उत्कृष्ट जल व्यवस्थापनासाठी सात मुख्य गोष्टीवर भर देणे ही काळाची गरज आहे.

या सप्तपदीमध्ये घनदाट जंगल निर्मिती, नदयांचे पुर्नजिवन, पीक व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, भुगर्भामधील पाणी संचय वाढविणे, पाणी केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण आणि शालेय अभ्यासक्रमात जल व्यवस्थापनास परिसर मध्ये एका धडयापुरते स्थान न देता स्वतंत्र विषयाची निर्मिती करणे. जलव्यवस्थापनामध्ये जंगल व्यवस्थापनाचा फार मोठा वाटा आहे.

एक पुर्ण वाढ झालेला वटवृक्ष त्याच्या शितल छायेखाली मुळांच्या सहाय्याने हजारो लिटर पाणी साठवत असतो. हे पाणी तेथे ओलाव्याच्या रुपात असते.एक वटवृक्ष तोडणे म्हणजे या हजारो लिटर पाण्याला तिलांजली देणे.

मराठवाडयामधील आजच्या या भिषण पाणी टंचाईला महामार्गावरील वटवृक्षांची स्मशानयात्राच कारणीभूत आहे. घनदाट जंगलामुळे पावसाचे पाणी जमिनीत धरुन ठेवले जाते आणि भुगर्भामधील जलसाठा वाढू लागतो. जंगलामुळे पाऊस पडतो असे नसून त्यामुळे तो टिकून राहतो.

पाऊस हा उत्तर दक्षिण मान्सून मुळे हजारो मैलावरून आपल्या देशात येतो पण त्या पावसाला धरुन टिकवून ठेवण्याचे काम हे जंगल म्हणजेच वृक्ष करत असतात. डोंगर दरीमधील घनदाट वृक्षराजी कायम राहिली तरच नदी वाहती राहिल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT