Kolhapur News : कोवाडे, मलिप्रे परिसरात गवे व वनगायींनी धुडगूस घातला आहे. कोवळा ऊस गवे व वनगायीचे कळप फस्त करीत आहेत. चंदगड तालुक्यामध्ये अनेकांच्या शेतातील उसाचा फडशा कळपांनी पाडला आहे. शेतकरी त्रस्त झाले असून ते तारेचे कुंपन करून गवे व वनगायींचा प्रतिबंध करत आहेत.
सध्या पेद्रेवाडी व मलिग्रे परिसरात जंगलांना आगी लागण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर जंगलातील खाद्य व पाण्याचे साठे संपत चालल्यामुळे गवे व वनगायींचे कळप शिवारात उतरत आहेत. त्यामुळे पिकांची हानी होत आहे. पंधरा दिवसांपासून गवे व वनगायींच्या कळपांचा शिवारात वावर वाढला आहे.
कोवाडे, मलिग्रे परिसरातील पाच सहा गावांतील उभे पीक हे कळप फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांनी राखण वाढवली आहे. पण, त्यालाही गवे व वनगायी दाद देईनाशा झाल्या आहेत. कोवाडेजवळील दळ्याच्या शेतातील पाच एकरांतील उसाचे पीक गवे, वनगायींनी फस्त केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विभागाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यात आले आहे.
गडहिंग्लज तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ
मासेवाडो या गडहिंग्लज तालुक्यातील गावातील लोक भीतीच्या वातावरणात आहेत. पंधरा दिवसांपासून हत्ती या भागात धुमाकूळ घालत आहेत. तसेच शेतकऱ्यांसह, वाहनधारकांवर झालेला हल्ला यामुळे गावात दहशत निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांकडून आम्ही जगायचं कसं? असा सवाल लोकप्रतिनिधी व प्रशासनाला करत आहेत. मासेवाडी हे तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले गाव, येथे शेती करणे इतके भयानक आहे की नेमकं कोणत्या आणि कुठल्या समस्येला तोंड द्यावे हेच शेतकऱ्यांना कळत नाही.
शेतकरी सहकुटुंब राखणीला जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांपासून लोकप्रतिनिधीपर्यंत सर्वाची दारे ठोठावूनही त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. एकीकडे कुटुंबाचे पालन करण्यासाठी कष्ट करणे आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांकडून पिकांचे रक्षण करणे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, या वन्यप्राण्यांची बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. अशा या वन्य प्राण्यांच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.