Crop Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Weed Issue : संततधार पावसाने पिकांत तण वाढले

Rain Update : खानदेशात मागील १५ दिवसांपासून अपवाद वगळता सर्वत्र सतत पाऊस सुरू आहे. काही भागांत मागील १५ ते १८ दिवसांत रोज पावसाने हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील १५ दिवसांपासून अपवाद वगळता सर्वत्र सतत पाऊस सुरू आहे. काही भागांत मागील १५ ते १८ दिवसांत रोज पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांत तण वाढले आहेत. पिके दिसेनाशी झाली असून, तणनाशकांचाही उपयोग करता येत नसल्याची स्थिती आहे.

यंदा पाऊस वेळेत आला. पिकेही वाढली. सोयाबीन, उडीद, तूर, मूग, कापूस आदी पिकांची पेरणी वेळेत सुरू झाली व वेळेत पेरणीही पूर्ण झाली. मध्यंतरी पिकांनीही तास धरले. कारण पाऊस येत होता. एक वेळेस खते देण्यासह बैलांकरवी आंतरमशागतही अनेकांनी पूर्ण केली. परंतु या महिन्यात सतत पाऊस पडत आहे.

मागील १५ दिवसांपासून सूर्यदर्शन अनेक भागांत झालेले नाही. शेतात वाफसा नाही. दुसरीकडे पिकांची वाढ खुंटली आहे. कारण काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. निचरा होत नसल्याने पिकांना फटका बसत आहे. सखल भागात पाणीही साचत आहे. यामुळे पिकांची हानी सुरू आहे.

मागील वेळेस दुष्काळाने हानी, यंदा पावसाने समस्या

मागील वर्षी कमी पाऊस होता. जुलैतही पेरण्या ४० टक्केही झालेल्या नव्हत्या. यंदा जुलैच्या सुरुवातीपर्यंतच पेरण्या ९२ टक्क्यांवर झाल्या आहेत. परंतु सततच्या पावसाने यंदा पिके हातातून जातील की काय, अशी चिंता आहे. मागील हंगामात कमी पावसाने किंवा पावसाच्या खंडामुळे दुबार पेरणीची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली होती.

यंदा अतिपावसाने पिके मोडावी लागतील की काय, अशीही स्थिती आहे. खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबारात पाऊसमान यंदा चांगले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ५३ टक्क्यांवर पाऊस झाला आहे. धुळ्यातही ५० टक्के तर नंदुरबारातही सुमारे ५१ टक्के पाऊस एकूण सरासरीच्या तुलनेत झाला आहे. जळगावचे पाऊसमान ६३२ मिलिमीटर, धुळ्याचे ५६५ मिमी तर नंदुरबारचे सुमारे ८३४ मिमी असे एकूण पाऊसमान आहे.

तणनाशक फवारणीही अशक्य

पिकात मागील १५ ते २० दिवसांत तण वाढले आहे. हे तण काढणे सध्या शक्य नाही. कारण मजुरांकरवी तण नियंत्रणासाठी चांगला वाफसा हवा आहे. वाफसा नसल्याने तण काढणे शक्य होत नाही. तणनाशकांचीही फवारणी करता येत नाही. तणनाशक फवारणीसाठी किमान दिवसभर पाऊस नसावा. पावसात तणनाशक फवारणी करता येत नाही. फवारणीनंतर अर्धा तास ते दोन तास त्यावर पाऊस नसावा, असेही सांगितले जाते.

परंतु मागील काही दिवसांपासून रोज पाऊस येत आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी व रात्री पाऊस येत आहे. कुठेही अतिजोरदार पाऊस नाही. यामुळे धरणांत जलसाठा वाढलेला नाही. परंतु भिज, भुरुभुरु स्वरूपातील हा पाऊस असल्याने वाफसाच होत नसल्याची स्थिती आहे. यंदा कीडनाशकांऐवजी तणनाशकांचा उपयोग व विक्री अधिक होत असल्याची माहिती बाजारातून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT