Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा

Weather-Based Crop Insurance Scheme : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील मोसंबी, लिंबू, संत्रा, सीताफळ, चिकू आणि पेरू या फळपिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२५-२६ लागू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nanded News : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील मोसंबी, लिंबू, संत्रा, सीताफळ, चिकू आणि पेरू या फळपिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२५-२६ लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ३० जून पर्यंत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मोसंबी, लिंबू, संत्रा, सिताफळ, चिकू आणि पेरू या फळपिकासाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाने तालुकानिहाय मंडळाची सूची जाहीर केली आहे. याच मंडळातील शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर फळपीक नोंदवले आहे व ते क्षेत्र शेतकऱ्यांच्या नावावर आहे, अशाच शेतकऱ्यांना लाभ मिळणार. अर्ज करण्यासाठी पोर्टलवर लॉगिन करावे. यासोबतच शेतकरी ओळख क्रमांक, आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, फळपिकांचे फोटो, जिओ टॅगिंग आवश्यक.

शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर अर्ज केल्यास विमा दावा नाकारला जाऊ शकतो. पूर्वी सहभागी शेतकऱ्यांनी या वर्षीही सहभागासाठी पुन्हा अर्ज करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने १७ मे २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, ही योजना लागू करण्यात आली असून, कृषी विभागामार्फत प्रचार व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

शेवटची तारीख ३० जून २०२५ असून, नोंदणी न केल्यास विम्याचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करून पिकांना हवामान आधारित विमा संरक्षण मिळवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

विमा संरक्षण रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम (हप्ता)

फळपिक विमा संरक्षित रक्कम विमा

हप्ता

मोसंबी १,००,००० ५०००

लिंबू ८०,००० ४०००

सीताफळ ७०,००० ३५००

चिकू ७०,००० ४९००

पेरू ७०,००० ३५००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT