Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Maharashtra Politics Update : राज्यात कोणी दाब, दडपशाही करत असेल तर खपवून घेणार नाही. बेरोजगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शेतीवरील बोजा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : नरेंद्र मोदी ज्या पद्धतीची भाषा करत होते, चारशेपेक्षा अधिक खासदार मागत होते, ते पाहता त्यांच्या मनात काहीतरी आहे. त्याचा परिणाम काय होईल याबाबत लोकांत अस्वस्थता होती. ५१ टक्के खासदार असले तरी कारभार करता येतो. मात्र घटनेबाबत मनात पाप होतेच असेच दिसतेय.

राज्यात कोणी दाब, दडपशाही करत असेल तर खपवून घेणार नाही. बेरोजगारी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शेतीवरील बोजा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या उमेदवार कृषिभूषण प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी (ता. १३) शिर्डी मतदार संघातील राहाता येथे शरद पवार यांची सभा झाली. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक वेगळ्या स्थितीत झाली. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीची भाषा करत होते, ते पाहता त्यांच्या मनात काहीतरी आहे. त्याचा परिणाम काय होईल याबाबत लोकांत अस्वस्थता होती. चारशे खासदार मागत होते. ५८० खासदारांपैकी ५१ टक्के खासदार निवडून आले तरी लोकांना देशाचा कारभार करता येतो.

घटनेमध्ये बदल करण्याचा, घटनेला धक्का लावण्याचा विचार त्यांच्या मनात आसावा, असे दिसतेय. लोकांनी महाराष्ट्रात चित्र बदलले, ३१ खासदार दिले. लोकसभेतील फटक्यामुळे नवीन योजना आणल्या. त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण आज जी गरज आहे ती बहिणींना संरक्षणाची. राज्यात सहा महिन्यांत ८६६ मुली गायब झाल्या आहेत.

त्या काय लाडक्या बहिणी नव्हत्या का, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत नाहीत. राज्यात पदवीधरांची आणि त्याबरोबरच बेरोजगारांची संख्या वाढली. त्यांच्या हाताला काम कुठे आहे? त्यासाठी महाविकास आघाडी सरकार आले तर चार हजारांचा भत्ता देऊन काही महिन्यांत उद्योग उभारणीसाठी मदत करणार आहोत. शेतीवरील बोजा कमी करण्याची गरज आहे. एकाने शेती करावी, दुसऱ्याने मिळेल तेथे काम करण्याची तयारी ठेवावी याबाबत महाविकास आघाडी नवीन धोरण राबवणार आहे.

भाषणावर बंदी येण्याची शक्यता : थोरात

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की उमेदवार प्रभावती घोगरे आणि माझ्यावर भाषण करण्याला बंदी येऊ शकते. तशी तयारी विरोधकांकडून सुरू आहे. माझ्या हाती त्याबाबतचे पुरावे मिळाले आहेत. राहाता तालुका समृद्ध भाग होता. येथील पाणी गेल्याचे सांगत पुन्हा स्वातंत्र्याचे, बंधुत्वाचे, वैभवाचे दिवस आणू. बटेंगे तो कटेंगे कसले, अरे महागाई, नोकऱ्या, शेतकरी प्रश्न, दूधदर, सोयाबीन दर यावर बोला. यावर उत्तर नसल्याने ते वाक्य आणले आहे, अशी टीका थोरात यांनी या वेळी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT