Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Politics : शेती आणि आरक्षणाचे विषय लोकसभेत आम्ही सातत्याने मांडले : सुप्रिया सुळे

Onion Rate : कांद्याला हमीभाव, दूध, कापूस सोयाबीनचा प्रश्‍न, तसेच मराठा, धनगर आरक्षणाबाबत सत्ताधारी किती वेळा संसदेत बोलले याबाबत त्यांना विचारा, असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Team Agrowon

Nagar News : कांद्याला हमीभाव, दूध, कापूस सोयाबीनचा प्रश्‍न, तसेच मराठा, धनगर आरक्षणाबाबत सत्ताधारी किती वेळा संसदेत बोलले याबाबत त्यांना विचारा, असे सांगून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, की धनगर, मराठा आरक्षणासह शेतीचे प्रश्‍न आम्ही संसदेत लावून धरले. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता.१०) भातकुडगाव फाटा (ता. शेवगाव) येथे प्रचारसभा झाली. त्या वेळी खासदार सुप्रिया सुळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नीलेश लंके, प्रतापकाका ढाकणे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अॅड. सुभाष लांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘मत मागताना आपण कोणासाठी मत मागतोय हे महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने अत्यंत चांगला आणि समाजासाठी काम करणारा उमेदवार दिला आहे. आम्ही कधीही कुणाचा अपमान करत नाही. आम्ही इतिहासात रमत नाही. आरोप आमच्यावरही होतात.

विरोधक महागाई, भ्रष्टाचार, महागाईवर न बोलता केवळ वैयक्तिक टीका करतात. लोकांसाठी काम केले पाहिजे. विकासासाठी पक्ष सोडून गेले असे सांगतात. विकासावर न बोलता वैयक्तिक टीकांवर भर दिला जातो. दहा वर्षे सत्तेत असताना कोणता विकास केला. कांदा, दूध सोयाबीनच्या दराबाबत विरोधक कधीही बोलत नाहीत. नीलेश लंके यांना आपल्याला संसदेत पाठवायचे आहे. त्यांना तुम्ही मत देऊन विजयी करा, असेही त्या म्हणाल्या.

‘बारामती मतदार संघाला दृष्ट लागली’

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘बारामतीत पैशाचे मोठ्या प्रमाणात वाटप झाले. रात्री बॅंका उघड्या होत्या. या प्रकरणी कारवाई झाली, मात्र ज्यांनी बॅंका रात्री उघड्या ठेवण्याचा आदेश दिला त्यांच्यावर नाही. तर ज्यांनी उघडी ठेवली त्यांच्यावर कारवाई झाली. त्यात बॅंक मॅनेजरची काय चूक? आमच्याकडे याचे सगळे व्हिडिओ आहेत.

आमच्या मतदार संघाला तर दृष्ट लागली. पैसे वाटले, गाड्या फोडल्या, बॅंका रात्रभर उघड्या ठेवल्या, शिवीगाळ केली. १४३ केसेस आमच्या मतदार संघात झाल्या आहेत. ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे बारामतीत झाले ते इथे होणार आहे. मोबाइल चालू ठेवा,’’ अशा सूचना सुळे यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT