Irrigation Scheme agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन पाणलोट योजनेचा बोजवारा

Watershed Scheme : योजना अंमलबजावणीकरिता पुणे येथील वसुंधरा कार्यालयास चार वर्षांपासून अपर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळेना.

Team Agrowon

Malinagar News : पंतप्रधान कृषी सिंचन पाणलोट घटक योजना महाराष्ट्रात जानेवारी २०२१ पासून सुरू झाली. परंतु, या योजनेचे शेवटचे वर्ष संपत आले तरी गाळात रुतलेले चाक प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य असलेल्या काही अधिकाऱ्यांच्या अतिअनुत्साही प्रवृत्तीमुळे जागचे हलेना.

योजना अंमलबजावणीकरिता पुणे येथील वसुंधरा कार्यालयास चार वर्षांपासून अपर मुख्य कार्यकारी अधिकारी मिळेना. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असल्याने तेही या योजनेकडे पुरेसे लक्ष व वेळ देण्यास असमर्थ आहेत.

बहुतेक करून योजना कंत्राटी कर्मचारी वर्गावर चालू आहे. तथापि, प्रशासनातील गतीतला अडथळा असलेले प्रभारी प्रशासन तथा लेखाधिकारी यांचे संथगतीने काम करण्याच्या स्वभावामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तीन-तीन महिने होत नाहीत.

त्यामुळे ज्यासाठी काम करतो तो पगारच मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना काम कसे करावे, यावर एखाद्या विद्यापीठाची पीएच.डी. होईल एवढा वाईट अनुभव कंत्राटी कर्मचाऱ्यांना येत आहे.

क्षेत्रीय कार्यालयांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र, त्याकडे लक्ष देण्यासाठी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही व त्यांच्याकडे तेवढी यंत्रणादेखील नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT