Watermelon Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Production : खानदेशात कलिंगड हंगामास फटका लागवड राहिली अधिक

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगडाची लागवड यंदा वाढली. त्यात फेब्रुवारीतच सरासरी तापमानात वाढ झाली. अधिक लागवडीने आवकही वाढली व दरांवरही दबाव होता. शिवाय उष्णता व विषम वातावरणाने कलिंगड पिकात उत्पादन कमी आले.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात कलिंगडाची लागवड यंदा वाढली. त्यात फेब्रुवारीतच सरासरी तापमानात वाढ झाली. अधिक लागवडीने आवकही वाढली व दरांवरही दबाव होता. शिवाय उष्णता व विषम वातावरणाने कलिंगड पिकात उत्पादन कमी आले.

मागील हंगामात कलिंगडाचे दर स्थिर होते. यामुळे यंदा अनेकांनी कलिंगड लागवडीस पसंती दिली होती. खरिपातील कलिंगड कमी होते. त्या वेळेसही कलिंगडाचे दर बरे होते. पुढेही दर चांगले राहतील. कमी कालावधीत बऱ्यापैकी नफा हाती राहील, यासाठी शेतकऱ्यांनी रब्बीत कलिंगड लागवडीस सुरवात केली. ही लागवड नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झाली. लागवड फेब्रुवारी २०२५ पर्यंत विविध टप्प्यात झाली. परंतु अनेकांनी लागवड केल्याने क्षेत्रात मोठी वाढ झाली.

मागील हंगामात रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली होती. मागील वेळेस प्रतिकूल स्थितीत अनेकांचे कलिंगड पीक खराब झाले होते. उत्पादन काहींना अल्प आले. पण ज्यांनी काटेकोर व्यवस्थापन केले, त्यांना चांगले उत्पादन हाती आले. तसेच मागील वेळेस दरही टिकून होते. यातून या हंगामात कलिंगड लागवडीकडे अनेक जण वळले. खानदेशात यंदा कलिंगडासाठी खते, बियाणे, पॉली मल्चिंग पेपर, विद्राव्य खते, किडनाशके यांची मोठी मागणीही राहीली. अनेकांनी पपई, केळी पिकात आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागवड केली. काहींनी मुख्य पीक म्हणून कलिंगडास पसंती दिली. यातून लागवड सतत वाढली. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत खानदेशात एकूण साडेआठ हजार हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली. लागवडीत दुप्पटीपेक्षा अधिकची वाढ झाली.

कलिंगड लागवडीसाठी खानदेशात जळगावमधील चोपडा, यावल, मुक्ताईनगर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे हा भाग प्रसिद्ध आहे. दरवर्षी दोन हंगामात कलिंगड लागवड या भागात असते. रब्बीत नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीत कलिंगड लागवड या भागात झाली. कापूस पीक काढून त्यात कलिंगड घेण्यात आले.

कलिंगडाचा खर्चही वाढला. तसेच काही वाणांची टंचाई होती. वाणांचे दरही अधिक द्यावे लागले. पुढे मार्चमध्ये कलिंगडाची आवक वाढली. खानदेशात या महिन्यात रोज ३० ते ३५ ट्रक (एक ट्रक १८ टन क्षमता) कलिंगडाची सरासरी आवक झाली. आवक अधिक राहिल्याने दरही घसरले. त्यात उष्णता, प्रतिकूल वातावरण यामुळे कलिंगडाचे नुकसानही झाले.

उष्णतेचा फटका अधिक

कलिंगड हे नाजूक वेलवर्गीय पीक आहे.अति उष्णतेत पिकहानी होते किंवा उत्पादन कमी येते. यंदा फेब्रवारीतच सरासरी तापमान वाढले. त्यापूर्वी थंडी होती. यामुळे फळधारणा कमी धाली. एकरी फक्त सात ते १० टन उत्पादन आले आहे. कमाल उत्पादन १० टनापेक्षा अधिक नाही. मागील हंगामात अनेकांना एकरी १७ ते १८ टन उत्पादन हाती आले होते. यात अनेकांचा खर्चही निघाला नाही . तर काहींना एकरी फक्त २० ते २५ हजार रुपये नफा हाती आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT