Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : उजनीतून शेतीसाठी १ नोव्हेंबरपासून सोडणार पाणी

Ujani Dam : सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात केवळ पुण्याकडील पावसावर धरण ६१ टक्क्यांपर्यंत भरले, पण सध्या पाणीपातळीत हळूहळू घट होत आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात केवळ पुण्याकडील पावसावर धरण ६१ टक्क्यांपर्यंत भरले, पण सध्या पाणीपातळीत हळूहळू घट होत आहे. असे असले तरी ऊस, डाळिंब, कांदा या प्रमुख पिकांसह अन्य पिकांसाठी सातत्याने पाण्याच्या होत असलेल्या मागणीनुसार शेतीसाठी पहिले आवर्तन एक नोव्हेंबरपासून सोडले जाणार आहे.

खरीप हंगामात पावसाळा सुरू असतानाही जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला हे पाच तालुके दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. त्या वेळी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी झाली, पण उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने पाणी सोडता आले नाही.

आता रब्बी पिकांसाठी उजनीतून दोन आवर्तने सोडली जाणार आहेत. १ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत पहिले आवर्तन सुटेल आणि त्यासाठी किमान ८ टीएमसी पाणी लागेल, असा अंदाज आहे. सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडल्यानंतर पुन्हा कॅनॉलमधून शेतीला पाणी सोडण्यास अडचणी येतात.

त्यामुळे एक महिन्याच्या अंतराने साधारण जानेवारीमध्ये दुसरे आवर्तन शेतीसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या वरच्या धरणाकडून येणारे पाणी कमी झाल्यामुळे आणि आर्द्रतेमुळे पाणीसाठ्यात घट होत आहे.

शनिवारी (ता. २८) धरणात एकूण पाणीसाठा ४९४.६७५ मीटर आहे. एकूण एकूण पाणीसाठा ९३.९२ टीएमसी आहे, तर त्यापैकी उपयुक्त साठा ३०.२६ टीएमसी एवढा आहे. तर या पाण्याची टक्केवारी ५६.४९ टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT