Tanker water supply Agrowon
ॲग्रो विशेष

Tanker Water Supply : सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा

Water Shortage Update : अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या केवळ दोन असताना आता मात्र सहा गावांना टँकद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Team Agrowon

Water Shortage In Amravati : अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. मागील आठवड्यात टँकरची संख्या केवळ दोन असताना आता मात्र सहा गावांना टँकद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ५४ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मागील वर्षी उत्तम पावसाळा झाल्याने यंदा पाणीटंचाईची फारशी तीव्रता जाणवणार नाही, असा कयास होता, मात्र तो फोल ठरला आहे. चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून सहा गावांना टँकर लागले आहेत.

तर ५४ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. सर्वाधिक टंचाई चिखलदरा तालुक्यात जाणवत असून आतापासूनच ग्रामस्थांना गावाबाहेरून, वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. येणाऱ्या काळात टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

...ही आहेत टँकरची गावे

चिखलदरा : मोथा, आकी, घोंगडा, रायपूर, सोमवारखेडा.

चांदूररेल्वे : सावंगी मग्रापूर.

...या तालुक्यांमध्ये अधिग्रहित झाल्या विहिरी

अमरावती, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, चिखलदरा, तिवसा, चांदूररेल्वे, अचलपूर, वरूड, मोर्शी.

पाणीपुरवठा विभागाकडून टंचाईकडे लक्ष दिले जात आहे. ज्या पद्धतीने उपाययोजनांची आवश्यकता राहील त्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे. अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत.
संदीप देशमुख, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT