Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जालना जिल्ह्यात १७२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

Water Issue : जालना जिल्ह्यातील तब्बल ९९ गावे आणि ३९ वाड्यांवरील तब्बल तीन लाख नागरिकांनी टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

Team Agrowon

Jalna News : जालना जिल्ह्यात गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने मार्च महिन्यात दुष्काळची धग अधिक वाढली आहे. परिणामी जिल्ह्यातील तब्बल ९९ गावे आणि ३९ वाड्यांवरील तब्बल तीन लाख नागरिकांनी टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात तब्बल १७२ टँकर सुरू आहेत.

पावसाने दगा दिल्याने यंदा खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला. तर दुसरीकडे या अल्प पावसामुळे जिल्ह्यातील पाणी पातळी ही अडीच मीटरपेक्षा अधिक खोल गेली आहे. शिवाय पाणी साठ्याने दम तोडला असून मध्यम आणि लघू प्रकल्पाने तळ गाठला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. मार्च माहिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात १७२ टँकर सुरू आहेत. त्यामुळे पुढील काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून टँकरच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

जालना तालुक्यातील १९ गावांसह १० वाड्यांमधील ५९ हजार २५८ ग्रामस्थांना ३६ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू असून एकूण ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बदनापूर तालुक्यातील १५ गावे, १० वाड्यांवरील ५२ हजार १७४ ग्रामस्थांसाठी २१ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर २४ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. भोकरदन तालुक्यातील ३४ गावे, चार वाड्यांतील ६२ हजार ५८४ ग्रामस्थांसाठी ४३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे. तर ४३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

...अशी आहे टँकरची स्थिती

भोकरदन नगरपालिका हद्दीतील ३२ हजार ६८० नागरिकांना २५ टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असून सहा विहिरीचे अधिग्रहण केले आहे. मंठा तालुक्यातील एक वाडीवरील एक हजार २५० ग्रामस्थांसाठी एका टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर १२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

अंबड तालुक्यातील ११ गावांमधील २९ हजार ८९५ ग्रामस्थांना १७ टँकरव्दारे पाणी पुरवले जात आहे. तर १५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. घनसावंगी तालुक्यातील १८ गावे व १४ वाड्यांवरील ५२ हजार ५२३ ग्रामस्थांसाठी २६ टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असून ३१ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT