Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे

Tanker Water Supply : माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पिके माना टाकू लागली आहे.

Team Agrowon

Saatara News : जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली असून, ११ पैकी तब्बल आठ तालुक्यांत टँकर सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पिके माना टाकू लागली आहे. जलसाठे आटू लागल्याने प्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य दिले जात आहे. पिण्याची पाण्यासाठी टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मार्च अखेरीस जिल्ह्यातील तब्बल आठ तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील १३७ गावे व ४३५ वाड्यावस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक माण तालुक्यात ७५ टँकरद्वारे ५५ गावे ३५१ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यात २७ टँकरद्वारे ३१ गावे १०६ वाडीवस्तीवर, फलटण तालुक्यात १८ टँकरद्वारे २३ गावे ७२ वाड्या-वस्तींवर, कोरेगाव तालुक्यात २१ टँकरद्वारे २४ गावात, खंडाळा एका टँकरद्वारे १ गावात, वाई तालुक्यात दोन टँकरद्वारे दोन गावे तीन वाडीवस्तीवर, पाटण तालुक्यात तीन टँकरद्वारे तीन वाड्या-वस्तींवर, कऱ्हाड तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात पाणीपुरवठा केला जात आहे.

दीड लाख पशुधन बाधित

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भूजल पातळीत घट होत आहे. जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवावी लागलत आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख ५९ हजार ६६० पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे.

‘८९ विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण’

जिल्ह्यात पाण्याची टंचाई वाढ होत असल्याने विहीर व बोअरवेलचे अधिग्रहणात वाढ केली जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ४२ विहिरीचे व ४७ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT