Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : जत, आटपाडी तालुक्यांतील ४४ गावांना टँकरने पाणीपुरवठा

Rain Update : यंदा निम्म्या जुलैनंतर पावसाने जोर धरला. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोऱ्यात गेले काही दिवस मुसळधार वृष्टीही झाली. कोयना आणि वारणा धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात चार तालुक्यांत अतिवष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली असताना दुष्काळीत जत आणि आटपाडी तालुक्यांत ४४ गावे आणि ३६६ वाड्यांना आणि २८ हजार पशुधनाला ५१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये जत तालुक्यातील ३९ आणि आटपाडी तालुक्यातील ५ गावे आहेत. सुमारे सव्वा लाखाहून अधिक लोकसंख्येला हा पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात यंदा निम्म्या जुलैनंतर पावसाने जोर धरला. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोऱ्यात गेले काही दिवस मुसळधार वृष्टीही झाली. कोयना आणि वारणा धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे शिराळा, वाळवा, मिरज आणि पलूस या चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. सुमारे चार हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

एकीकडे अशी चार तालुक्यांत पूरसदृश स्थिती असताना दुसरीकडे जत, आटपाडी या तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष करून जत तालुक्यातील ४१ गावे सध्या टंचाईग्रस्त आहेत. तर आटपाडी तालुक्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई आहे.

तसेच खानापूर तालुक्यातील तीन आणि कवठेमहाकाळ तालुक्यातील एका गावात टंचाईची स्थिती आहे. अशा एकूण ५१ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती आहे. त्यापैकी जत तालुक्यातील ३९ गावे आणि ३०७ वाड्या तर आटपाडी तालुक्यातील ५ गावे आणि ५८ वाड्यांना ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

गतवर्षी जवळपास ३२ टक्के कमी पाऊस झाला होता. त्यामुळे नोव्हेंबरपासूनच दुष्काळी तालुक्यात पाणीटंचाई जाणवली होती. विशेष करून जत आणि आटपाडीतील गावे टंचाईग्रस्त झाली होती. आता पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही ५१ गावे आणि ३६५ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. त्यापैकी ४४ गावे आणि ३६५ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT