Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : दवणेमळा, कुंभारकरवाडी परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा

Water Crisis : परिसरातील दवणेमळा व कुंभारकरवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई सुरू झाल्याने येथे टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : परिसरातील दवणेमळा व कुंभारकरवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई सुरू झाल्याने येथे टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बबन झगडे यांनी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे टॅंकर सुरू करावा, या बाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले होते.

तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिला. त्यानुसार येथे पिण्याच्या पाण्यासाठी दररोज दोन खेपा याप्रमाणे कुंभारकरवाडी, दोरगेवाडी व दवणेमळा येथे टँकर सुरू करण्यात आला. येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. टॅंकर सुरू झाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.=

चंद्रकांत झगडे, संतोष दोरगे, भरत पवार, दीपक शिर्के, संजय शिर्के, गोरख थोपटे, मधुकर थोपटे, नारायण झगडे, मल्हार झगडे, अरविंद झगडे, नवनाथ झगडे यांनी यासाठी टॅंकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.

दवणेमळा दोरगेवाडी, कुंभारकरवाडी हा परिसर जेजुरी ग्रामीण म्हणून आहे. हा परिसर ग्रामपंचायतीसाठी प्रस्तावित आहे. ग्रामपंचायत अथवा नगरपालिका यामध्ये समावेश नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

या परिसरासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी योजना नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरात टॅंकर सुरू करावा लागतो. यंदा तर दुष्काळी स्थिती असल्याने तीव्र टंचाई आहे. विहिरींचे पाणी खोल गेले आहे. पावसाळा येईपर्यंत चार महिने टॅंकरवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT