Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Tanker : चाळीसगावच्या ११ गावांमध्ये टँकर

Water Shortage : चाळीसगाव तालुक्यात या वर्षी पुरेशा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता, तालुक्यातील १४ मध्यम व लघू प्रकल्पांपैकी केवळ तीनच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : ः चाळीसगाव तालुक्यात या वर्षी पुरेशा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष पाहता, तालुक्यातील १४ मध्यम व लघू प्रकल्पांपैकी केवळ तीनच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. अकरा प्रकल्पांमध्ये आजही ठणठणाट आहेत.

याशिवाय २२ खेड्याचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणात केवळ एक टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या वर्षी अनेक गावांना टंचाईची दाहकता सोसावी लागणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच टंचाई निवारणार्थ प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील मन्याड धरणाचा परिसरातील जवळपास ३० गावांना फायदा होता. ‘मन्याड’च्या पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे गहू, हरभरा आणि भुईमूग आदी पिके घेतात. जेव्हा या धरणात शंभर टक्के जलसाठा असतो, तेव्हा मन्याडचा परिसर समृद्धीने नटलेला असतो.

या वर्षी मात्र पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने केवळ एक टक्क्यावर धरणातील पाणीसाठा आहे यामुळे रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याने शेतकरी आतापासूनच चिंतातूर झाले आहेत.

या वर्षी ऑक्टोबर उजाडला तरीही गिरणा नदीला एकही पावसाच्या पाण्याचा पूर गेलेला नाही. तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांपैकी खडकीसीम, वाघले- १ व २ हेच प्रकल्प शंभर टक्के भरले असून, कृष्णापुरी प्रकल्प ६४ टक्के झाला आहे.

काही प्रकल्प कोरडे

हातगाव-१, पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे, पिंपरखेड, कुंझर-२, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळी-भोरस व पथराड या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नाही. तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा दमदार पाऊस झालेला नाही.

यामुळे आजही अकरा लघू प्रकल्पांत ठणठणाट आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गिरणा धरणात ५७ टक्के जलसाठा आहे. या साठ्यामुळे चाळीसगाव शहराचा, तसेच गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न मिटला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT