Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : वन क्षेत्रातही टँकरने पाणी

Water Crisis : खानदेशात सातपुडा, वन क्षेत्रातही टंचाई आहे. या भागातील अनेक तलाव, नद्या, नाले कोरडे आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सातपुडा, वन क्षेत्रातही टंचाई आहे. या भागातील अनेक तलाव, नद्या, नाले कोरडे आहेत. यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

जळगावात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील धडगाव, अक्कलकुवा, शहादा, तळोदा भागात वन क्षेत्र अधिक आहे. यावल, कुऱ्हा वढोदा वन क्षेत्रात वाघासह अन्य प्राणी आहेत.

जंगलांमधील नैसर्गिक पाणवठे आटले असून, प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांद्वारे उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे. उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढत असून, जिल्ह्याच्या तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सर्वांना बसत आहेत.

तसेच सातपुड्यातील अनेक पाड्यांत एक हंडा पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. वन्य प्राण्यांना देखील उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत असून, उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्राण्यांना देखील बसत असून जंगलातील बहुतेक सर्वच नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वन विभागातर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठयांद्वारे वन्य प्राण्यांची तहान भागवली जात आहे.

सातपुडा व अन्य क्षेत्रातील वन क्षेत्रात जंगलामध्ये हरण, काळवीट, निलगायी, रान डुकरे, मोर, ससे, कोल्हे, माकड या प्राण्यांचा अधिवास पहायला मिळतो. तीव्र उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे दिलासादायक ठरत आहेत. कारण पाण्यासाठी प्राणी याच काळात जंगल, वन क्षेत्र सोडून मानवी क्षेत्रात येतात. शेतांत मुक्काम करतात. या स्थितीत प्रशासनाने जंगलातही टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT