water storage in Marathwada 
ॲग्रो विशेष

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठा ८६ टक्क्यांवर

Water Stock : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा आता ८६.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. असे असले तरी मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी ८ लघु प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा आता ८६.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. असे असले तरी मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी ८ लघु प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सात व धाराशिवमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

मराठवाड्यातील ७५० पैकी ४५ लघु प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही जोत्याखाली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील १६, जालन्यातील ४, बीडमधील ७, लातूरमधील ३, धाराशिव मधील १५ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय चार मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही ज्योत्याखाली आहे.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर व जालन्यातील प्रत्येकी एक तर धाराशिवमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. ११ मोठ्या प्रकल्पात ९४.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ७५ माध्यम प्रकल्पात ७४.५९ टक्के, ७४९ लघू प्रकल्पात ७०.७० टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ७४.५९ टक्के तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यात ७८.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

चार मोठे प्रकल्प तुडुंब

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी उपयुक्त पाणीसाठा बाबत चार मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. त्यामध्ये मांजरा, ऊर्ध्व पैनगंगा, निम्नमनार व सीना कोळेगाव या प्रकल्पांचा समावेश आहे. जायकवाडी प्रकल्पात ९९ टक्के, येलदरीत ८९ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ९९ टक्के, माजलगावमध्ये ६७ टक्के निम्न तेरणामध्ये ९७ टक्के, विष्णुपुरीत ८८ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

७५० लघू प्रकल्पांपैकीची स्थिती

मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजी नगरमधील ९८ लघू प्रकल्पात केवळ ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात ५६ टक्के, बीडमधील १२६ लघू प्रकल्पात ७८ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात ८६ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ५७ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ९८ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पात ८८ टक्के तर हिंगोलीतील २७ लघु प्रकल्पात ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

७५ मध्यम प्रकल्पांपैकीची स्थिती

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजी नगर मधील १६ प्रकल्पात ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. याशिवाय जालनामधील सात मध्यम प्रकल्पात ५६ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ९९ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पात ७५ टक्के, धाराशिव मधील १७ प्रकल्पात ७० टक्के, नांदेडमधील नऊ प्रकल्पात ९६ टक्के परभणीतील दोन प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT