Parbhani Water Shortage News Agrowon
ॲग्रो विशेष

Parbhani Water Shortage : लघु प्रकल्पातील ८ टक्के, मध्यम प्रकल्पातील ७ टक्के पाणीसाठा घटला

गुरुवारी (ता. २३) जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी राणीसावरगाव (ता. गंगाखेड) या १ लघु प्रकल्पांमध्ये ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

Team Agrowon

Parbhani Water Shortage News : गेल्या काही दिवसात तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. तसेच बेसुमार उपासा आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात (Water Stock) मागील पंधरावाड्यात ८ टक्के आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात ७ टक्के घट झाली.

गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ३७ टक्के तर २ मध्यम प्रकल्पांमध्ये ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

पंधरा दिवसापूर्वी गुरुवारी (ता. ९) लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४५ टक्के आणि मध्यम प्रकल्पांत सरासरी ६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

गुरुवारी (ता. २३) जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी राणीसावरगाव (ता. गंगाखेड) या १ लघु प्रकल्पांमध्ये ८१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

एकूण ४ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के त्यात तांदूळवाडी (ता. पालम) तलावात ६६ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात ६० टक्के, वडाळी (ता. जिंतूर) तलावात ५२ टक्के,पाडाळी (ता. जिंतूर) ५९ टक्के या तलावांचा समावेश आहे. एकूण १३ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

त्यात झरी (ता. पाथरी) ४३ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) तलाव ३२ टक्के, टाकळगाव (ता. गंगाखेड) तलावात ३१ टक्के, कोद्री (ता. गंगाखेड ) तलावात ३१ टक्के, देवगाव (ता. जिंतूर) तलावात ३४ टक्के, बेलखेडा (ता. जिंतूर) तलावात २८ टक्के पाणीसाठा आहे.

चारठाणा (जिंतूर) तलावात २८ टक्के, चिंचोली (ता. जिंतूर) तलावात ३० टक्के, आडगाव (ता. जिंतूर) तलावात ३३ टक्के, भोसी (ता. जिंतूर) तलावात ४० टक्के, कवड (ता. जिंतूर) ३२ टक्के, मांडवी (ता. जिंतूर) ३० टक्के, दहेगाव (ता. जिंतूर) ३१ टक्के या तलावांचा समावेश आहे.

एकूण ४ लघु तलावांमध्ये ० ते २५ टक्के पाणीसाठा आहे. त्यात पेडगाव (ता. परभणी) तलाव २३ टक्के, आंबेगाव (ता. मानवत) तलावात १५ टक्के, जोगवाडा (ता. जिंतूर) तलावात १८ टक्के,केहाळ (ता. जिंतूर) तलाव १४ टक्के या तलावांचा समावेश आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती अशी...

गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६१ टक्के पाणीसाठा आहे. त्यात निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पात ५८ टक्के तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ६३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

गतवर्षी (२०२१-२२) या कालावधीत २२ लघु तलावांमध्ये सरासरी ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT