Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : वारवंड परिसरात तीव्र पाणीटंचाई

Water Shortage : वारवंड (ता. भोर) परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतीच्या वतीने टँकर सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : वारवंड (ता. भोर) परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायतीच्या वतीने टँकर सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नीरा देवघर धरणाचा पाणीसाठा शुक्रवार (ता. ११) सकाळपर्यंत २७.३८ टक्क्यांवर आला होता. सध्या पॉवर हाऊसमधून ७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही तळ गाठू लागल्या आहेत. यावर्षी पाणी टंचाईचा फटका सर्वात प्रथम वारवंडला बसला आहे. गावात पाणीटंचाई भासू लागली आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यापासून भोर-महाड रस्त्याच्या सुरु असलेल्या ठेकेदाराला ग्रामस्थांनी विनंती केल्याने दररोज १० हजार लीटर पाणी एक टँकरने विहिरीत सोडले जात आहे. त्यामुळे तात्पुरती पाण्याची सोय होत आहे.

गावची लोकसंख्या २३० असून पाळीव जनावरे ११० आहेत. एप्रिल महिन्याचा पुढील पंधरवडा, मे महिना पूर्ण व जून महिन्यातील पावसाला सुरु होईपर्यंतचे दिवस असे जवळपास दोन ते अडीच महिने वारवंड ग्रामस्थांना पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने भोर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे टँकर सुरु करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे.

गतवर्षीपेक्षा पाणी टंचाई कमी

हिरडस मावळातील पऱ्हर बुद्रूक व वाड्या-वस्त्या, शिळिंब, राजीवडी, उंबर्डे, वारवंड, कुडली खुर्द, शिरवली हिमा या गावाचे गेल्या वर्षी टँकरचे प्रस्ताव मार्च महिन्यात मंजुरीसाठी आले होते. यावर्षी यातील वारवंड गावचाच प्रस्ताव पंचायत समितीकडे आला आहे.

समाधानकारक पडलेला पाऊस व जलजीवन योजनेची झालेली कामे यामुळे गतवर्षीपेक्षा पाणी टंचाई कमी आहे. तालुक्यातील जलजीवन योजनेच्या १७८ पैकी ८६ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर. एस. पिसाळ यांनी सांगितले.

करंदी खे.बा. व साळवडे गावचे टँकरचे आलेले प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील साळवडे गावचा प्रस्ताव नुकताच मंजूर झाला आहे. वारवंडचाही प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. प्रस्ताव मंजूर होताच टँकर सुरु करण्यात येतील.
- एम. व्ही. भामरे, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग, भोर पंचायत समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT