Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सोलापुरात पाणी टंचाईच्या झळा वाढल्या

Water Shortage : सोलापुर जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. सध्या मार्च महिना सुरू असूनही, कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. सध्या मार्च महिना सुरू असूनही, कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. हे वाढते ऊन टंचाईमध्ये आणखीनच भर घालत आहे. परिणामी, पाण्याची टंचाई तीव्र होत आहे. आजघडीला जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १५ गावांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ही संख्या आता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.

यंदा पुरेशा पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगाम जेमतेम झाला असताना आता उन्हाळी हंगामातील शेतीचे भविष्य धूसर झाले आहे. पण त्याहूनही अधिक पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात सध्या नागरिकांचे हाल सुरू आहेत.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतीच जिल्ह्यातील सर्व प्रातांधिकारी, तहसीलदार, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी टंचाईच्या उपाययोजना करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यातील पाण्याच्या स्थितीचा अंदाज घ्या, त्याबाबतचा अहवाल द्या, अशा सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत.

या प्रकल्पासह नदीच्या परिसरातील वीजपुरवठा या आधीच खंडित करण्याची सूचना देण्यात आली आहे. सध्या माळशिरसमधील सर्वाधिक नऊ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याशिवाय करमाळ्यातील चार गावे, माढ्यातील एक, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी एक अशा १५ गावांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासणार

जिल्हा परिषदेकडूनही पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या पाण्याच्या पातळीचा अहवाल मागितला आहे. तो अहवाल आल्यानंतर टंचाई निवारणासाठी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यानंतरही टंचाईग्रस्त गावातील टंचाई निवारण न झाल्यास टँकर सुरू केले जाणार आहेत, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT