Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : नगर जिल्ह्यात ३८ गावांसह २१० वाड्यावस्त्या तहानल्या

Water Shortage : तब्बल ३८ गावे व २१० वाड्यावस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या गावांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यातील तब्बल ३८ गावे व २१० वाड्यावस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या गावांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील ७६ हजार ६३३ नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी ३८ टँकरद्वारे १०७ खेपा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यात पाथर्डी व संगमनेर तालुक्यातील पठारी भागातील गावांची संख्या सर्वाधिक आहे. टँकरवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉरमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेने एक हजार १८५ गावे आणि तीन हजार ८८६ वाड्या-वस्त्यांवर पुढील जून २०२४ पर्यंत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून ८६ कोटी ७२ लाख रुपये खर्चाचा टंचाई आराखडा तयार केला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ८४ कोटींची तरतूद केली आहे. जानेवारी महिन्यापासून काही गावांना पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली. या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

टँकरला जीपीएस यंत्रणा

३८ गावे व २१० वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. या दृष्टीने नियोजन व तयारी करण्यात आली आहे. या टँकरच्या १०७ खेपा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे.

मुळा- भंडारदरात ५० टक्के पाणीसाठा

भंडारदरा, मुळा, निळवंडे या तीन मोठ्या धरणांसह आढळा, मांडओहळ, पारगाव घाटशीळ, सीना, खैरी, विसापूर या मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ५१ हजार ९३ दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यात ४५ हजार १२२ दक्षलक्ष घनफूट उपयुक्त जलसाठा आहे. भंडारदरा, मुळा, निळवंडे या तीन प्रकल्पांत सध्या २१ हजार ५११ दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. भंडारदरा धरणात ४८, तर मुळात ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाव्या मजल्यावर वॉररूम स्थापन केला होता. या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षात डॅशबोर्ड लावण्यात येणार असून, खास सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टँकरवर देखरेख ठेवली जाणार आहे.
- भारती घोरपडे, नायब तहसीलदार, आपत्ती निवारण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत भर

Farm Loan Waiver: ३० जुलै पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

Safed Musli: सफेद मुसळी लागवडीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Fructose vs Glucose: साखरेचे खाणार, पण कोणत्या?

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती : अटीशर्ती अन् संघर्ष

SCROLL FOR NEXT