Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : घारापुरी बेटावर पाणी टंचाईचे संकट

Water Shortage Condition : पावसाने पाठ फिरवल्याने घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

Team Agrowon

Mumbai News : पावसाने पाठ फिरवल्याने घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना यंदा तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी पुरती खालावली असून नवीन वर्षात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर, शेतबंदर अशी तीन गावे आहेत. या बेटावरील जगप्रसिद्ध कोरीव लेण्या पाहण्यासाठी हजारो देशी-विदेशी पर्यटक येत असतात. या पर्यटकांमुळेच बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट असे लघुउद्योग सुरू आहेत. या सर्वांना पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण या परिसरात आहे.

दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मेअखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणात पाणीसाठाही मर्यादित राहिलेला आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी निधीची मागणी

घारापुरी हे बेट असल्याने टॅकरने पाणीपुरवठा शक्य नाही. पाणीटंचाई दूर करण्यासाठी बोटीने पाणीपुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT