Team Agrowon
भर हिवाळ्यात शहरासह तालुक्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाकडून विहिरी अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
त्यातच आजघडीला हिवाळ्यातच ही स्थिती आहे तर उन्हाळ्यात काय होणार, याची चिंता सर्वांना लागली आहे.
यंदा जेमतेम पाऊस झाल्याने जवळपास सर्वच भागातील नदी, नाल्या, विहिरी, लहान, मोठे, जलसाठे, गाव तलाव कोरडेठाक पडले आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणारे भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पही पूर्णपणे रिकामा झाला आहे.
परिणामी भोकरदन शहरात मागील दोन ते अडीच महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. तालुक्यातील २५ ते ३० गावातील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.