Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाणीटंचाईचा उन्हाळी पिकांच्या लागवडीवर फटका

Summer Sowing : पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील मका, भूईमूग पिकांच्या लागवडीला फटका बसला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांची १ हजार ६२० हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील मका, भूईमूग पिकांच्या लागवडीला फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी उन्हाळी हंगामातील पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात उन्हाळी पेरणी सुरू झाली आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळी कमी आहे. तर कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांची लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात उन्हाळी पिकांची सरासरी क्षेत्र ३ हजार ५१८ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात उन्हाळी मका, भुईमूग, तृणधान्यासह अन्य पिकांची पेरणी केली जाते. वास्तविक पाहता दुष्काळी पट्ट्यातील जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, यांसह इतर तालुक्यात मका पिकाची पेरणी केली जाते.

मुळात, दुष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी, कवेठमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू आहेत. मात्र, कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत आहे. त्यामुळे योजना सुरू ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत.

जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र १ हजार ७१० हेक्टर आहे. तरीही या भागात मका पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली असून १ हजार २२१ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर भुईमुगाचे सरासरी क्षेत्र ६८९ हेक्टर क्षेत्र असून २४१ हेक्टरवर पेरा झाला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. मात्र, उन्हाळी सोयाबीन पिकाचे रोगामुळे नुकसान झाले. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकरी सोयाबीन लागवड करण्यासाठी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. उन्हाळी सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता नाही. तसेच उन्हाळी हंगामातील पिकांची लागवडही घटण्याची शक्यता असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

चाऱ्याची ६१३ हेक्टरवर लागवड

जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव या तालुक्यांत चाऱ्याचा प्रश्न गंभीर असतो. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी मका, कडवळ यांसह अन्य चारा पिकांची लागवड करण्यासाठी पुढे येतात. मात्र, यंदा मिरज, जत, शिराळा, कवठेमहांकाळ या चार तालुक्यांतच चारा पिकाची लागवड ६१३ हेक्टरवर लागवड झाली आहे.

तालुकानिहाय उन्हाळी पिकांची

लागवड दृष्टिक्षेप (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज १०१.७

जत ३६३.५

खानापूर १६६

वाळवा २७

शिराळा २७

आटपाडी ४८९

कवेठमहांकाळ २५४

पलूस १.२

कडेगाव १९२

एकूण १६२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गाव-वाड्यांच्या संख्येत भर

Farm Loan Waiver: ३० जुलै पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

Safed Musli: सफेद मुसळी लागवडीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Fructose vs Glucose: साखरेचे खाणार, पण कोणत्या?

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती : अटीशर्ती अन् संघर्ष

SCROLL FOR NEXT