Water Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : जलसंपदा विभागाने व्यवस्थापनावरही भर द्यावा

Department Of Water Resources : कोल्हापूर हा पाण्याने समृद्ध असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात घू, मध्यम, मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही बांधण्यात आले असून यात सुमारे ९४ टीएमसी पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ‘‘राष्ट्रीय विकासात योगदान देण्यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचा कार्यक्षम वापर करून कृषी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच शाश्वत जलस्त्रोत निर्माण करण्यासोबतच जल व्यवस्थापनावरही भर द्यावा,’’ असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी केले.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या वतीने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत शेतकरी संवाद व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा झाली. या वेळी जलसंपदा विभागाचे उप अधीक्षक अभियंता संजय पाटील कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, अशोक पवार, देवाप्पा शिंदे, कारभारवाडीचे नेताजी पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना पाणी परवाने व प्रगतशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

श्री. म्हेत्रे म्हणाले, की कोल्हापूर हा पाण्याने समृद्ध असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात घू, मध्यम, मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच कोल्हापूर पद्धतीचे बंधारेही बांधण्यात आले असून यात सुमारे ९४ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकूण लाभक्षेत्रापैकी बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली आले असले तरी शंभर टक्के क्षेत्र अद्याप ओलिताखाली आलेले नाही. त्यामुळे धरणांमध्ये दहा ते पंधरा टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो.

परंतु भविष्यात पूर्ण क्षमतेने सिंचन क्षमता निर्मिती झाल्यानंतर सध्या उपलब्ध असणारे पाणी कमी पडण्याची शक्यता निर्माण होवू शकते. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच परंपरागत शेती पद्धतीमध्ये बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच पाण्याचा योग्य वापर करणेही आवश्यक आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या पुराच्या पाण्यापैकी धरणातून सोडण्यात येणारे पाणी केवळ पंधरा टक्के असून धरणाच्या खालील बाजूच्या क्षेत्रामधून येणारे म्हणजेच फ्री कॅचमेंट मधून येणारे पाणी ८५ टक्के आहे. त्यामुळे नदीमध्ये येणाऱ्या या एकत्रित पाण्याचे योग्य नियोजन होणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश विशद केला. आभार कार्यकारी अभियंता अशोक पवार यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT