Satara News : कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने पाण्याची आवक धरणात सुरू झाली आहे. सध्या धरणाचा सांडवा व पायथा वीजगृहातून ११,६४६ क्युसेकने विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन धरण व्यवस्थापकाकडून करण्यात येत आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना ६५, नवजा ८०, महाबळेश्वर ११४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात २३,७८७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरण व्यवस्थापनाने गुरुवारी सकाळी पाच वाजता पायथा वीजगृहातून २१०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला.
त्यानंतर शुक्रवारी रात्री १२ वाजता सांडव्यावरून नऊ हजार ५४६ क्युसेकने विसर्गात वाढ करण्यात आली. सध्या धरणाच्या सांडवा व पायथा वीजगृहातून ११,६४६ क्युसेकने विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना धरणात सकाळी आठपर्यंत १०५.२५ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी बहुतांश भागात ऊन पडले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.