अॅग्रोवन वृत्तसेवा
Hingoli News : हिंगोली ः सिंचन तसेच इतर कामांसाठी पाणी वापर व व्यवस्थापनाबाबत शेतकरी व नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी जलसंपदा विभागातर्फे मंगळवार (ता. १५) ते बुधवार (ता. ३०) या कालावधीत जल व्यवस्थापन कृती व जलसंपदा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गंत जिल्ह्यात शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद, कालवा स्वच्छता अभियान आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत.
जल व्यवस्थापन कृती व जलसंपदा पंधरावड्याचा प्रारंभ मंगळवारी (ता. १५) होणार आहे.बुधवारी (ता. १६) जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली जाईल.गुरुवारी (ता.१७) स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, शुक्रवारी (ता. १८) शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद कार्यक्रम होईल.
शनिवारी (ता. १९) भूसंपादन व पुनर्वसन अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी तर रविवारी (ता. २०) कालवा स्वच्छता अभियान, सोमवारी (ता. २१) उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीचे निरसन करणे, मंगळवारी (ता. २२) अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोधून कार्यवाही करणे,बुधवारी (ता.२३) जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबाबत उत्पादकता वाढ, पाणी नियोजन बैठक, कार्यशाळा घेण्यात येईल.
गुरुवारी (ता. २४) सिंचन-ई-प्रणाली, पाणी दर, पाणी पट्टी आकारणी व वसुली थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा तर शुक्रवारी (ता. २५) विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र,सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम होईल.
शनिवारी (ता. २६) महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुर्नवापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी येत असल्याबद्दल प्रकरणाचा शोध घेणे रविवारी (ता. २७) आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, सोमवारी (ता. २८) महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाच्या नावे संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे, अतिक्रमण निष्कासन ३१ मे पूर्वी करणे, मंगळवारी (ता. २९) पाणी वापर संस्था सक्षमीकरण, चर्चासत्र व कार्यशाळा आहे.बुधवारी (ता. ३०) पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा तसेच पंधरवडा कालावधीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्याचे सत्कार व पंधरवडा समारोप होईल, असे जलसंपदा विभागाच्यासूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.