Water Conservation Awareness  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : ‘जल हे विश्व’मधून शेतकऱ्यांचे प्रबोधन

Agriculture Irrigation : सूर्या प्रकल्पातील धामणी व कवडास धरणाचा जलसाठा आणि शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. अनेक शेतकरी या पाण्यावर भात व पालेभाज्यांचे उत्पन्न घेतात.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यातील कासा, वेती आणि धामटणे येथे पाटबंधारे विभाग, पालघर व मनोर; तसेच आरती क्रीएशन, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्थांवर आधारित मनोरंजनात्मक ‘जल हे विश्व’ प्रबोधन नाटिकेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.

सूर्या प्रकल्पातील धामणी व कवडास धरणाचा जलसाठा आणि शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. अनेक शेतकरी या पाण्यावर भात व पालेभाज्यांचे उत्पन्न घेतात. डहाणू व पालघर तालुक्यातील ६७ गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील कवडास धरणातून उजव्या (६५ किमी) आणि डाव्या (३३ किमी) कालव्यांद्वारे १५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. याचा उपयोग उन्हाळी भात व भाजीपाला उत्पादनासाठी केला जातो.

मात्र, काही वर्षांपासून कालव्यांची योग्य दुरुस्ती न झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात होते. ज्यामुळे शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यात अडचणी येत होत्या. याला उपाय म्हणून पाटबंधारे विभागाने कालव्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

तर दुसरीकडे मनोरंजनात्मक ‘जल हे विश्व’ प्रबोधन नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. धामटणे येथील या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अनिल नारगुलवार, तवा ग्रामपंचायत सरपंच लहू बालशी, ग्रामविकास अधिकारी सखाराम सातवी, तसेच पाटबंधारे विभागाचे अभियंते प्रवीण भुसारे व प्रदीप भोये उपस्थित होते. शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमादरम्यान, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेण्याचे; तसेच पाणी वाचवून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जागरूकता निर्माण होईल, पिकांची उत्पादकता वाढेल आणि जलसंपत्तीचा शाश्वत उपयोग साधता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या ६ खासदारांची बैठकीला दांडी, आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु, बंडखोरांना राऊतांचा इशारा

Agrowon Podcast: कापूस स्थिर; हिरवी मिरची टिकून , लसणाला उठाव, बेदाणा आवक कमी तर टोमॅटोला मागणी

Paddy Seedlings: भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Krishna River Upasa: ‘कृष्णे’तून उपसा, रोखायला भरारी पथके

Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ

SCROLL FOR NEXT