Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Water Crisis : म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ शिवारात दाखल झाले आहे. ओढ्याच्या पात्रातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Team Agrowon

Sangli News : : म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ शिवारात दाखल झाले आहे. ओढ्याच्या पात्रातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे पाणी निगडी येथील दोड्डानाला मध्यम प्रकल्पात जाणार आहे.

अजूनही पाण्याचा विसर्ग म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्याने जादा सोडावा तरच या मध्यम प्रकल्पात पाणी लवकर जाऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. माडग्याळ परिसरात पाण्याची तीव्र टंचाई सुरू होती. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनला होता.

या भागातील सर्व विहिरी कोरड्या ठणठणीत होत्या. बोरवेलचे पाणीही कमी झाले आहे. बऱ्याच ठिकाणी बोरवेल्स कोरड्या ठणठणीत आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई या परिसरात जाणवत होती.

म्हैसाळच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी मागणी करूनही या भागात पाणी येत नव्हते. जत पूर्व भागात बऱ्याच गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पाण्याचा उद्धव फक्त दोडानाला मध्यम प्रकल्पाखालील विहिरींनाच आहे. त्यामुळे या भागातील टँकर या प्रकल्पातून पाणी घेऊन जात होते.

त्या ठिकाणीही पाण्याचा उद्भव कमी झाला होता. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत होती. याची जाणीव ठेवून म्हैसाळच्या अधिकाऱ्याने या परिसरात पाणी सोडले आहे. माडग्याळच्या शिवारात पाणी दाखल झाले आहे. ओढापात्रातून पाणी वाहू लागले आहे. माडग्याळचा दोडकल तलाव भरल्यानंतर सोन्याळच्या शिवारात पाणी जाते. तिथून दोड्डानाला प्रकल्पात पाणी जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Maharashtra: दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा केल्यास निलंबनाची कारवाई, महसूल विभागाचे निर्देश

Calf Care in October Heat: ऑक्टोबर हीटपासून वासरांच्या संरक्षणाचे ५ उपाय

Fish Production Decline: मत्स्य उत्पादनाची घसरण सुरूच!

Manavlok Sanstha and Babuji: चौफेर कार्य करणारी मानवलोक संस्था आणि बाबूजी...

Natural Farming Training: तळसंदेत कृषी सखींना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT