Nar-Par-Girna Project Agrowon
ॲग्रो विशेष

Girna Dam : गिरणा, अनेरमधून आवर्तन मिळू लागले

Agriculture Irrigation : खानदेशात यंदा पाऊसमान चांगले राहीले. यामुळे गिरणासह अनेर, पांझरा नदीत पाणी सोडले जाणार आहे. परंतु वाळू उपसा सुरूच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पाऊसमान चांगले राहीले. यामुळे गिरणासह अनेर, पांझरा नदीत पाणी सोडले जाणार आहे. परंतु वाळू उपसा सुरूच आहे. पाणी जिरण्यास व पाणी अडविण्याची कार्यवाही होत नसल्याने पाऊस असूनही नदीकाठीदेखील टंचाई तयार होईल, अशी स्थिती आहे.

गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांत बेसुमार वाळू उपशाने नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नसल्याने जलसाठे कमी होत असल्याची स्थिती असून, ही समस्या दूर करण्यासाठी वाळू चोरी थांबविण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.

गिरणा नदीत मागील महिन्यातच कानळदापर्यंत आवर्तन सोडले होते. पण कानळदा पुढील गावांपर्यंत नदीतून पाणी पोहोचलेच नाही. या भागात बेसुमार वाळू उपसा सुरू असतो. गेले २५ ते ३० वर्षे वाळू उपसा सुरू असल्याने गिरणा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये टंचाई तयार झाली आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

अन्यथा, गावांच्या सार्वजनिक विहिरी, कूपनलिकांचे जलस्रोत आटतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पांझरा नदीतूनही पाण्याची मागणी धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यांतून केली जाते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. नदीकाठी टंचाई कमी राहणार आहे. पण वाळू उपशाने टंचाई तयार होते. कारण वाळूअभावी पाणी वाहून जाते.

ते नदीत जिरत नाही. पशुधनासह पिण्याच्या पाण्याची समस्या पुढे फारशी तयार होणार नाही. परंतु शिवारात काही कूपनलिकांचे पाणी कमी होईल. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जाते. यंदा गिरणातून पुढे आणखी दोन वेळेस नदीत पाणी सोडले जाईल. यामुळे किमान १२० गावांमधील जलस्रोत टिकून राहतील, असा विश्‍वास शेतकरी, ग्रामस्थांना आहे.

ग्रामपंचायतींनी पाण्याचे योग्य नियोजन करावे

सध्या हवामान थंड आहे. यामुळे गावोगावी पाण्याचा वापर कमी आहे. अनेक गावांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यामुळे गावोगावी टंचाई कमी राहील. त्यासाठी ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांनी देखील पाण्याचा अतिवापर टाळावा, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation: आंबा-काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषिमंत्र्यांना घेरले

PACS Computerization: बारा हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण

Maharashtra Sowing Update: राज्यात केवळ तीन टक्के पेरण्या

Maharashtra Rain Forecast: राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT