Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Department : पाणी मागणी अर्ज ३० डिसेंबरपर्यंत सादर करावेत

Rabi Irrigation : जलाशयावरील ज्या पाणी वापर संस्थांना उपसा सिंचनाचा परवाना दिलेला आहे अशा सर्व पाणी वापर संस्थांनी नमुना नं. ७ वर पाणी मागणी दाखल करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Nashik News : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत असलेल्या पालखेड डावा कालवा कि. मी. ० ते ११० व पालखेड धरणाचे फुगवट्यातील तसेच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, रौळसप्रिंपी, शिरसगाव त्याचप्रमाणे ओझरखेड डावा कालवा तसेच करंजवण, वाघाड, तिसगाव व जांबुटके लघू प्रकल्पांतील पाण्याचा लाभ घेणाऱ्या पाणी वापर संस्था व नमुना नं. ७ चे मागणी धारकांनी रब्बी हंगाम २०२३-२४ साठी पाणी मागणी अर्ज ३० डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी केले आहे.

रब्बी हंगाम सन २०२३-२४ मध्ये वर उल्लेख केलेल्या व त्यांच्या कालव्याचा समादेश क्षेत्रापैकी स्थापन झालेल्या व कार्यरत असलेल्या पाणी वापर संस्था व उपसा सिंचन परवानगी धारकांसाठी जलाशयात उपलब्ध असलेल्या पाण्यातून बिगर सिंचन आरक्षणाचे पाणी वजा जाता उर्वरित पाणी हे रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये संस्थेच्या देय पाणी कोट्यातून निर्धारीत करून एक आवर्तनात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तसेच प्रकल्पावरील उपसा सिंचन पाणी वापर संस्थांना हंगामातील उभ्या पिकांसाठी एक आवर्तनात सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. अधिक पाणी लागणाऱ्या पिकास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहणार आहे. मुदतीनंतर आलेल्या मागणी अर्जांचा विचार केला जाणार नाही किंवा मुदत वाढविली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अनधिकृत पाणी वापराचा पंचनामा होणार

जलाशयावरील ज्या पाणी वापर संस्थांना उपसा सिंचनाचा परवाना दिलेला आहे अशा सर्व पाणी वापर संस्थांनी नमुना नं. ७ वर पाणी मागणी दाखल करणे आवश्यक आहे. ज्या पाणी वापर संस्था नमुना नं.७ वर पाणी मागणी अर्ज विहित मुदतीत दाखल करणार नाहीत त्यांच्यावर नियमाप्रमाणे व प्रचलित धोरणानुसार व हंगामात मागणी न करताच त्याच क्षेत्रातील पिकास पाणी घेतल्याचे आढळून आल्यास ती पाणी वापर संस्था अनधिकृत समजून त्यावर उभ्यापिकाच्या क्षेत्राचा अनधिकृत पाणी वापराचा पंचनामा करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT