Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Mhaisal Water Crisis : ‘उटगी, निगडी तलावांत ‘म्हैसाळ’चे पाणी सोडा’

Water Scarcity : जत तालुक्यातील उमदी, उटगी, निगडी बुद्रुक, सोन्याळ, माडग्याळ परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.

Mahesh Gaikwad

Sangli News : जत तालुक्यातील उमदी, उटगी, निगडी बुद्रुक, सोन्याळ, माडग्याळ परिसरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाने पूर्व भागाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान, म्हैसाळ कालव्यातून माडग्याळ, उटगी ओढापत्रात सायपन पद्धतीने पाणी सोडावे, अन्यथा बुधवारी (ता. १४) सकाळी १० वाजता जत-चडचण मार्गावर सोन्याळ फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीत पाण्याचे राजकारण करून मंगळवेढ्याकडे जाणारे पाणी म्हैसाळ कालवा जेसीबीद्वारे फोडून माडग्याळ, उटगी ओढापात्रातून पूर्ण क्षमतेने तलाव भरण्यात आले. सांडव्याद्वारे पाणी उमदी गावापर्यंत सोडण्यात आले.

विधानसभा निवडणूक होऊन पाच महिने झाले, तरी पाण्याचा पत्ताच नाही. म्हैसाळ कालव्यातून माडग्याळ, उटगी ओढापत्रात पाणी सोडण्यासाठी सहायक कार्यकारी अभियंता म्हैसाळ कालवा उपविभाग जत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे येथील पिण्यासह जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.

पाण्यासाठी केवळ आश्वासन

माडग्याळ येथून थेट म्हैसाळ कालव्याद्वारे सध्या मंगळवेढा तालुक्यातील गावांना पाणी सुरू आहे. मात्र जत तालुक्यातील शेतकऱ्यांना हे पाणी मिळत नाही, हा दुर्दैव आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाच महिन्यांपासून पाणी आज सोडणार, उद्या सोडणार असे आश्‍वासन दिले जात आहे. मात्र पाण्याची वाट पाहिल्याने शेतकरी निराशाग्रस्त झालेला आहे. या तलावात म्हैसाळ योजनेतून पाणी नाही सोडले तर ऊस, द्राक्ष उत्पादकांना पिके जगवणे कठीण जाण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT