Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : ओढे, बंधारे आटले; डोळे सिंचन योजनांकडे

Water Scarcity : पाणी टंचाईची शक्यता असल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी केली.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील ओढे, तलावातील पाणीसाठा घटला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांतील पाणी तळाला जाऊ लागले आहे. पाणी टंचाईची शक्यता असल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी केली. सध्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे तपासणी आवर्तन सध्या सुरू आहे.

कालवे, पंप तपासले जात आहेत. नियमित आवर्तन सुरू राहण्यासाठी मागणी अर्ज भरावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर येऊ लागला आहे.

म्हैसाळ येथील उपसा सिंचन योजनेच्या पंप आणि कालव्यांच्या तपासणीसाठीचे आवर्तन सुरू करून आठ दिवस झाले. आता सुरळीत, नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे विभागाची तयारी पूर्ण झाली आहे.

सलगरे, बेळंकी, शिपूर, कळंबी या कालव्यांतून पाणी सोडण्याची तयारी आहे. त्याची आता आवश्‍यकतादेखील निर्माण झाली आहे. ओढे पूर्ण आटले आहेत. तलावातील पाणीसाठा घटला आहे. काही ठिकाणी बंधाऱ्यांत थोडे पाणी शिल्लक आहे. आठ-दहा दिवसांहून अधिक काळ हा साठा पुरणारा नाही.

दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत, यासह अन्य भागातील शेतकऱ्यांनी आवर्तन सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी द्यावे, अशी मागणी करू लागले आहेत.

अशा वेळी तातडीने आवर्तन सुरू झाल्यास एप्रिल, मे मध्ये ताण येणार नाही. परिणामी, म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकर सुरू करावे, अशी मागणी होत असली तरी, पाणी मागणीचे अर्ज शेतकऱ्यांनी करावे, असा फतवा पाटबंधारे विभागाने काढला आहे.

ओढ्याला धार होती, विहिरी, कूपनलिकांत पाणी होते, तोवर अडचण नव्हती. आता पाणी कमी झाले आहे. ऊस तुटला आहे. द्राक्ष बागा, भाजीपाला, चाऱ्याच्या पिकांना पाणी हवंय. कालव्यातून पाणी सुरू करावे. शेतकरी मागणी अर्ज भरत आहेत. पाटबंधारे विभागाने कर्मचाऱ्यांना त्याबाबत सूचना द्याव्यात.
- बाबगोंडा पाटील, सभापती, विष्णुअण्णा फळ मार्केट
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे तपासणी आवर्तन सध्या सुरू आहे. कालवे, पंप तपासले जात आहेत. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज दाखल करावेत. तातडीने आवर्तन सुरू केले जाईल. त्यात विलंब होणार नाही, मात्र मागणी आवश्यक आहे.
- रोहित कोरे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT