Contaminated water supply Agrowon
ॲग्रो विशेष

Contaminated Water : सांगली जिल्ह्यातील ६४ गावांतील पाणी दूषित

Sangli Contaminated Water Issue : सांगली जिल्ह्यातील ६४ गावांमधील ६७ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दूषित पाणी आढळले आहे

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील ६४ गावांमधील ६७ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात दूषित पाणी आढळले आहे, त्यांना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. त्यानंतर पुन्हा पाणी नमुने दूषित आल्यास ग्रामसेवक व ग्रामपंयातीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

ग्रामीण भागात साथीच्या आजारांचा प्रसार थांबवून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेकडून पाण्याचे नमुने तपाले जातात. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांतील १ हजार १८५ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ६४ गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले.

या सर्व गावांतील ग्रामसेवकांना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी दूषित पाणी आढळून आलेल्या गावांतील पाण्याचे नमुने पुन्हा दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

तालुका व दूषित पाण्याची गावे

आटपाडी : करगणी, दिघंची, वाक्षेवाडी, य.पा.वाडी, पडळकरवाडी, नेलकरंजी, बोंबेवाडी.

जत : शेड्याळ, तिप्पेहळ्ळी, अचकनहळ्ळी, बेवनूर, वाळेखिंड, सोनलगी.

मिरज : इनामधामणी, नरवाड, दुधगाव, सांबरवाडी, ढवळी, कळंबी, कानडवाडी, भोसे, पद्माळे.

तासगाव : गव्हाण, बलगवडे, मांजर्डे, येळावी, गौरगाव, जुळेवाडी.

पलूस : पुणदीवाडी, धनगाव, दुधोंडी, संतगाव.

वाळवा : बेरडमाची इटकरे, मसुचीवाडी, फार्णेवाडी, साखराळे, कणेगाव, मालेवाडी, दुधारी, ताकारी, चिकुर्डे, पडवळवाडी, कामेरी, करंजवडे, जुनेखेड.

शिराळा : धसवाडी, खुजगाव, बेलेवाडी, रिळे, बोंबेवाडी, शिवरवाडी, खेड, निगडी.

खानापूर : कमळापूर, कळंबी.

कडेगाव : खेराडे विटा, कोतीज, कुंभारगाव, रामापूर, सोनसळ, देवराष्ट्रे, वांगी, अंबक, चिंचणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT